Mumbai Pune express way : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खोपोली बाह्यमार्गापासून वाहतुकीत मोठा बदल; अशी असेल वाहतूक-major change in traffic from khopoli expressway on mumbai pune expressway such will be the traffic ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Pune express way : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खोपोली बाह्यमार्गापासून वाहतुकीत मोठा बदल; अशी असेल वाहतूक

Mumbai Pune express way : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खोपोली बाह्यमार्गापासून वाहतुकीत मोठा बदल; अशी असेल वाहतूक

Feb 28, 2024 07:59 AM IST

Mumbai Pune express way : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणार असाल तर या मार्गावरील वाहतूक बदल लक्षात घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai Pune express way
Mumbai Pune express way

Mumbai Pune express way traffic change : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वरील क्षमतावाढ प्रकल्पातील वळण रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. यमुळे खोपोली बाह्यमार्गात मुंबई वाहिनीवर सोमवारपासून वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.

Mumbai Bhayander Fire : मुंबईत अग्नितांडव! भाईंदरमधील आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग, काही नागरिक जखमी

नव्या बदलानुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने खोपोली गावाकडे जाण्यासाठी हलक्या व जड अवजड वाहनांनी मुंबई वाहिनीच्या उजव्या बाजूच्या दोन लेनमध्ये तर मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी डाव्या बाजूच्या तीन लेनमध्ये वाहतूक करावी लागणार आहे.

या वाहतूकीच्या बदलामुळे द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी ९८२२४९८२२४ या क्रमांकावर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

या मार्गावर सध्या गॅन्ट्री बसविण्याचे काम सुरू आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ही बऱ्याच वेळा बंद ठेवण्यात येते. यामुळे देखील या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते. मुंबई-पुणे महामार्गावर दररोज लाखोंच्या संख्येने वाहनं ये-जा करत असतात. परंतु गेली काही दिवसांपासूंन या मार्गावर सातत्याने या कामासाठी मेगा ब्लॉक घेतला जात आहे. यामुळे वाहनचालकांना मनस्ताप होत आहे. या मार्गावर अपघात आणि अपघाताची संख्या कमी करण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.

Whats_app_banner
विभाग