Sangli Accident : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर सांगलीजवळ कारचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sangli Accident : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर सांगलीजवळ कारचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार

Sangli Accident : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर सांगलीजवळ कारचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार

Feb 19, 2024 08:38 PM IST

Sangli Accident : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर असणाऱ्या शिरढोण पूलाजवळचालकाचाभरधावकारवरीलताबा सुटल्यानेकार डिव्हायडरवर जाऊन आदळली. यात तीन जण जागीच ठार झाले.

अपघातग्रस्त वाहन
अपघातग्रस्त वाहन

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कार दुभाजकावर आदळून झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोणजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये एक महिला व दोन पुरुष आहेत. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी-नागपूर महामार्गावर असणाऱ्या शिरढोण पूलाजवळ चालकाचा भरधाव कारवरील ताबा सुटल्याने कार डिव्हायडरवर जाऊन आदळली. यात तीन जण जागीच ठार झाले. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. मृत महिलेचे नाव राधा जाधव असल्याचे सांगितले जात आहे.

अपघातग्रस्त वाहन सांगोल्याहून कोल्हापूरकडे जात होते. दरम्यान शिरढोण गावाजवळील उड्डाणपुलावर भरधाव कार रस्त्याकडेला असलेल्या दुभाजकावर आदळली. कारमध्ये चार जण प्रवास करत होते. त्यातील तीन जण जागीच ठार झाले तर एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्यावर मिरजेतील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृत व जखमी कोल्हापूरचे असल्याचे समोर आले आहे. सांगोल्याहून परतताना त्यांनावर काळाने घाला घातला. 

अपघातग्रस्त वाहन हुंदाई क्रेटा आहे. या गाडीला सहा एअरबॅग्ज अजूनही प्रवाशांचे प्राण वाचू शकले नाहीत. कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढले व जखमीला रुग्णालयात हलवले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर