कल्याणमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह उमेदवाराला नडला! फटाक्यांच्या ठिणगीमुळे केस जळाले; थोडक्यात बचावले
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कल्याणमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह उमेदवाराला नडला! फटाक्यांच्या ठिणगीमुळे केस जळाले; थोडक्यात बचावले

कल्याणमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह उमेदवाराला नडला! फटाक्यांच्या ठिणगीमुळे केस जळाले; थोडक्यात बचावले

Nov 18, 2024 11:19 AM IST

Kalyan west constituency : कल्याणमध्ये प्रचारसभेत कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळे उमेदवाराचा जीव थोडक्यात वाचला. एका प्रचार रॅलीमध्ये फटाके फोडल्याने उमेदवाराच्या डोक्यावरचे केस जळाले.

कल्याणमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह उमेदवाराला नडला; फटाक्यांच्या ठिणगीमुळे केस जळाले; थोडक्यात बचावले
कल्याणमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह उमेदवाराला नडला; फटाक्यांच्या ठिणगीमुळे केस जळाले; थोडक्यात बचावले

Kalyan west constituency : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. प्रचाराचा आज शेवटचा दिवस आल्याने उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या साठी अनेक सभा रॅली काढण्यात आहे. कल्याण येथे अशाच एका प्रचार रॅलीत कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळे एका उमेदवाराचा जीव थोडक्यात बचवला. पश्चिम कल्याणमध्ये प्रचार रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्याने उमेदवारांच्या डोक्यावरचे केस जळाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होता आहे. काल रविवार असल्याने अनेकांनी सभा, रॅली, रोड शो घेत प्रचारात रंगत आणली. कल्याण पश्चिम मतदारसंघात देखील रविवारी जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा यांनी प्रचार रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांच्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे ते थोडक्यात बचावले.

काय आहे नेमकी घटना ?

जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा यांचा कल्याण पश्चिममध्ये प्रचार सुरू होता. या निमित्त रॅली काढण्यात आली. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली. तर काहींननी त्यांच्या स्वागतासाठी मोठा हार देखील तयार केला. तब्बल दीडशे किलो वजनाचा हार हा क्रेनच्या साहाय्याने राकेश मुथा यांच्या गळ्यात घालण्यात आला. या हारावर काही स्पार्कर्स फटाके कार्यकर्त्यांनी लवले होते. ही फटाके फुटताच त्याची एक मोठी ठिणगी ही उडाली आणि राकेश यांच्या डोक्यावर येऊन पडली. यामुळे त्यांच्या केसांना आग लागली. यात त्यांच्या डोक्यावरील केस जळाले. ही बाब त्यांनच्या आजूबाजूला असलेल्या काहींच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने आग विझवली. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

कल्याण पश्चिममध्ये चुरशीची लढत

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात काटे की टक्कर आहे. या मतदार संघात थेट शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून सचिन बासरे तर शिंदे गटाकडून विश्वनाथ भोईर हे निवडणूक रिंगणात नशीब आजमावत आहेत. या सोबतच मनसेचे उल्हास भोईर हे देखील या निवडणुकीत उभे आहेत. त्यामुळे या मतदार संघात कोण बाजी ममरणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर