Ladki Bahin Yojana Publicity : राज्यात लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. याचा फायदा महायुतीसरकारला झाला. विधानसभेत न भूतो न भविष्यती यश महायुतीला मिळालं. आता, या योजनेच्या व्यापक प्रसिद्धीसाठी सरकारने पुढाकार घेतला असून यासाठी ३ कोटी रुपयांना मंजूरी दिली आहे. या निधीच्या सोशल आणि डिजिटल माध्यमातून या योजनेची प्रसिद्धी केली जाणार आहे. या साठी माहिती व जनसंपर्क विभागाने माध्यम योजने तयार केली असून त्याला मंजुरी देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली. या योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये महिना देण्याचे जाहिर करण्यात आले. यासाठी वार्षिक अडीच लाख रुपये उत्पन्न मर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. या योजनेसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अर्ज आले. पात्र, महिलांना तब्बल ५ महिन्यांचे ७ हजार रुपये लाभार्थी महिल्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी हे हप्ते लाखो महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले. सुरवातीला या योजनेच्या प्रसिद्धीसाठी २०० कोटी रुपयांना मंजूरी दिली. त्यानंतर आता पुन्हा ३ कोटी रुपयांची मंजूरी या योजनेच्या सोशल आणि डिजिटल माध्यमात प्रचार, प्रसार करण्यासाठी करण्यात आली आहे.
या योजनेतील अपात्र, महिलांची नावे आता सरकार बाद करणार आहे. यापूर्वी या योजनेचे बोगस लाभार्थी सोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षक यांच्यामार्फत हे सर्वेक्षण केले जाणार आहे. लाभार्थी व्यक्तीच्या घरी किंवा नातेवाईक यांच्याकडे कार आढळल्यास अशा लाभार्थी महिलांची नावे या योजनेतून बाद केली जाणार आहे. ज्या महिला या योजनेच्या निकषांत बसत नाही त्यांनी स्वत:हून या योजनेतून नावे काढून घेण्याचे देखील आवाहन सरकारने केले आहे.
संबंधित बातम्या