उद्धव ठाकरेंचे उमेदवार महेश सावंत यांनी मनसेच्या भावनिक प्रचाराची हवाच काढली! काय बोलले पाहा!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  उद्धव ठाकरेंचे उमेदवार महेश सावंत यांनी मनसेच्या भावनिक प्रचाराची हवाच काढली! काय बोलले पाहा!

उद्धव ठाकरेंचे उमेदवार महेश सावंत यांनी मनसेच्या भावनिक प्रचाराची हवाच काढली! काय बोलले पाहा!

Oct 31, 2024 06:15 PM IST

Mahim Assembly Election : अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार उतरवल्यावरून मनसेकडून होणाऱ्या टीकेला माहीमचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरेंचे उमेदवार महेश सावंत यांनी मनसेच्या भावनिक मुद्द्याची हवाच काढली!
उद्धव ठाकरेंचे उमेदवार महेश सावंत यांनी मनसेच्या भावनिक मुद्द्याची हवाच काढली!

Maharashtra Assembly Elections 2024 : माहीम-दादर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांनी मनसेकडून केल्या जाणाऱ्या भावनिक प्रचाराची हवाच काढून टाकली आहे. अनेकदा लोक स्वत:चा मोठेपणा दाखवण्यासाठी काही गोष्टी करत असतात. प्रत्यक्षात त्यामागची कारणं वेगळीच असतात, असा टोला त्यांनी राज ठाकरे व त्यांच्या नेत्यांना हाणला आहे.

मुंबईतील माहीम-दादर मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर शिंदे सेनेचे सदा सरवणकर व ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत रिंगणात आहेत. या मतदारसंघात मनसेकडून वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार केला जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार द्यायला नको होता. आदित्य ठाकरे हे २०१९ साली वरळीतून उभे असताना राज ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत तिथं उमेदवार दिला नव्हता. तोच मनाचा मोठेपणा उद्धव ठाकरे यांनी दाखवायला हवा होता, असं मनसेकडून सांगितलं जात आहे. प्रचाराला भावनिक वळण देण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, ठाकरेंचे शिलेदार महेश सावंत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या प्रचाराला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

वरळीत मनसेकडं तेव्हाही उमेदवार नव्हता, आताही नाही!

'राज ठाकरे यांनी २०१९ साली मनाचा मोठेपणा दाखवला हा केवळ प्रचार आहे. खरंतर, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उभा करण्यासाठी वरळीत मनसेकडं कुणी उमेदवारच नव्हता. त्यामुळं असं पसरवलं गेलं की घरातला कुणीतरी उभा राहतोय म्हणून आम्ही मोठं मन दाखवतोय. मोठेपणा गाजवण्यासाठी लोक असं करत असतात. पण जनता सुज्ञ असते, असं महेश सावंत म्हणाले.

आदित्य ठाकरे हे अचानक वरळीतून निवडणुकीसाठी उभे राहिले नव्हते. ते खूप आधीपासूनच मुंबईच्या प्रश्नांवर काम करत होते. वरळीशी त्यांचा संपर्क कायम होता. तिथं त्यांनी फोकस केला होता. त्यामुळं लोकांनी त्यांना निवडलं. त्यासाठी पाठिंब्याची गरज नव्हती. उद्धव ठाकरे हे कधीच राज ठाकरे यांच्याकडं पाठिंबा मागायला गेले नव्हते. तसं कधी बोललेही नव्हते’, याकडंही सावंत यांनी लक्ष वेधलं.

'२०१९ ला त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला होता तर तो आताही का नाही दाखवला? आजही वरळीत मनसेची ताकद नसताना तिथं उमेदवार दिला गेलाय. तोही माहीममधून निर्यात केला गेलाय. तुमची ताकद होती तर तिथलाच उमेदवार द्यायचा होता, असा टोला सावंत यांनी हाणला.

बाळा नांदगावकरांनी बाळासाहेबांचा किती मान राखला?

उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा होता असं वक्तव्य मनसेचे बाळा नांदगावकर यांनी केलं होतं. त्यांचाही सावंत यांनी समाचार घेतला. 'नांदगावकरांनी या सगळ्यावर बोलूच नये. बाळासाहेबांनी नांदगावकरांना काय-काय दिलं. त्यांनी बाळासाहेबांचा काय मान राखला?, असा रोखठोक सवाल सावंत यांनी केला.

Whats_app_banner