Mahesh Kothe Death : कुंभमेळ्यासाठी प्रयागराय येथे गेले असताना हृदयविकाराच्या झटक्याने सोलापूरचे माजी महापौर व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते महेश कोठे यांचे निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. आज पहाटे त्यांना हृदयविकाराझाचा झटका आला. यात त्यांचं निधन झालं. महेश कोठे यांनी सोलापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून २०२४ ची विधानसभा निवडणूक निवडणूक लढवली होती. त्यांच्या निधनाने सोलापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू असून या मेळाव्यात महेश कोठे हे गेले होते. आज पहाटे त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना तातडीने स्थानिक दवाखान्यात भरती करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. महेश कोठे हे सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते होते. त्यांनी सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
महेश कोठे यांचा सोलापूरच्या राजकारणात मोठा दबदबा होता. सोलापूर महापालिकेचे ते महापौर होते. महेश कोठे हे सोलापूरचे सर्वात तरुण महापौर होते. या सोबतच ते विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते देखील राहिले आहेत. त्यांनी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट अशा विविध पक्षात कार्यरत राहिले आहेत. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे सोलापूरमध्ये हलहळ व्यक्त केली जात आहे.
महेश कोठे हे राष्ट्रवादी शरड पवार गटाचे मोठे नेते होते. यांनी २०२१ मध्ये शिवसेनेला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यावर महेश कोठे यांनी शरद पवार गटात राहण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उत्तर सोलापूर मतदार संघातून त्यांना उमेदवारी दिली होती. त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, सोलापूर उत्तर मतदारसंघातून महेश कोठे हे विजय देशमुख यांच्याकडून पराभूत झाले होते. यापूर्वी देखील त्यांनी चार ते पाचवेळा विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, ते पराभूत झाले होते. त्यांचं महापालिकेच्या राजकारणावर मोठा प्रभाव होता. महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठे हे सध्या आमदार असून महेश कोठे यांचे महानगर पालिकेत १० ते १५ आमदार निवडून यायचे.
संबंधित बातम्या