मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महायुतीला झटका! घटक पक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत; विधानसभा स्वबळावर लढवण्याचा निर्धार

महायुतीला झटका! घटक पक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत; विधानसभा स्वबळावर लढवण्याचा निर्धार

Jun 12, 2024 10:59 PM IST

Maharashtra Politics : प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीत२०जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर प्रहार संघटना महायुतीतून बाहरे पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

घटक पक्ष बाहेर महायुतीत पडण्याच्या तयारीत
घटक पक्ष बाहेर महायुतीत पडण्याच्या तयारीत

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीची सोडत आपला उमेदवार उभा करणाऱ्या प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी विधानसभा निव़डणुकीसाठीही ‘एकला चलो’ची भूमिका घेतली आहे. विधानसभेला वेगळं होऊन लढण्याच्या निर्णयाने बच्चू कडू यांनी महायुतीचे टेन्शन वाढवली आहे. प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू महायुतीतून बाहरे पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण विधानसभा निवडणुकीत २० जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी जाहीर केला आहे. 

प्रहार जनशक्ती पक्षाची उद्या (गुरुवार) बैठक बोलाविण्यात आली असून त्यामध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय होणार आहे.  आज पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, लोकसभेला बच्चू कडू यांना सोबत का घेतले नाही, हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रणाची मी वाट पाहिली नाही. एनडीएकडून एक-एक पाऊल पडत आहे. ते आमच्यादृष्टीने सोईचे पडत आहे. आम्ही सोबत राहून त्यांना मदत केली. पण एका वर्षात त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागले आहेत. दोन दिवसात पुढील निर्णय घेतला जाईल. 

ट्रेंडिंग न्यूज

महायुतीत राहिल्यानंतरही २० जागा लढवणार का? यावर बच्चू कडू म्हणाले की, महायुतीत राहिलो तर याचा अर्थ असा नाही की, आम्ही निवडणूक लढवू नये. एक राजकीय पक्ष म्हणून आम्हाला निवडणूक लढवावीच लागेल, निवडणूक लढवणं हा कोणत्याही राजकीय पक्षाचा मुख्य उद्देश असतो.

दरम्यान, आम्ही लढणार असेल २० जागा या केवळ विदर्भातल्या नसतील तर संपूर्ण महाराष्ट्रातील असतील. तसेच कडू म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही त्यांनी भाष्य केलं. मंत्रिमंडळ विस्तार झाला, तरी मला मंत्रीपद मिळणार नाही आणि त्यांनी मला मंत्रिपद दिलं, तरी मी ते घेणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले.

जरांगे पाटलांनी जास्तीत जास्त आमदार निवडून आणावे -

जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यांची समाजाला गरज आहे. त्यांनी जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याच्या तयारीला लागावे. त्यांनी आता आंदोलन करू नये, उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती बच्ची कडू यांनी केली. 

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर