ऐन उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा! वीजेचे दर होणार कमी; महावितरणच्या प्रस्तावावर लवकरच होणार शिकामोर्तब
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ऐन उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा! वीजेचे दर होणार कमी; महावितरणच्या प्रस्तावावर लवकरच होणार शिकामोर्तब

ऐन उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा! वीजेचे दर होणार कमी; महावितरणच्या प्रस्तावावर लवकरच होणार शिकामोर्तब

Published Feb 12, 2025 11:00 AM IST

Mahavitaran Electricity Bill : राज्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. उन्हाळ्यात वीजबिळात कपाट करण्याचा प्रस्ताव महावितरणने दिला आहे.

 ऐन उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा! वीजेचे दर होणार कमी; महावितरणच्या प्रस्तावावर लवकरच होणार शिकामोर्तब
ऐन उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा! वीजेचे दर होणार कमी; महावितरणच्या प्रस्तावावर लवकरच होणार शिकामोर्तब

Mahavitaran Electricity Bill : राज्यातील वीजग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. महावितरणने वीजदर कपाती संदर्भात प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ऐन उन्हाळ्यात वीजबीलात मोठी कपात होणार आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरणने घरगुती वीजदर कमी करण्याचा प्रस्ताव मांडला असून या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना कमी दरात वीज मिळणार आहे. महावितरणने दिवसा वीज वापरणाऱ्या ग्राहकांना जास्त सवलत देण्याचा प्रस्ताव दिला आहे. नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २०२५ पासून हा प्रस्ताव लागू होणार आहे. राज्यात सौर ऊर्जा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येत असल्यामुळे वीजबिलातील ही घट शक्य हॉट असल्याचे या प्रस्तावाचा आणि निर्णयाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.

काय होणार बदल ?

महावितरणच्या या निर्णयानुसार एप्रिल महिन्यापासून वीज दरात प्रति युनिट ८० पैसे ते १ रुपया इतकी कपात होण्याची शक्यता आहे. २०२५-२६ ते २०२९-३० या पाच वर्षांच्या कालावधीत वीज दरात १२ ते १३ टक्क्यांची घट अपेक्षित आहे. असे झाल्यास ऐन उन्हाळ्यात नागरिकांना येणाऱ्या वीजबिळात मोठी घट होणार असून याचा फायदा हा सर्व सामान्य नागरिकांना होणार आहे. महावितरणने दिलेल्या माहितीनुसार १०० हून कमी युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात ५.१४ रुपयांवरून २.३० रुपयांची घट होऊ शकते. तर १०१-३०३ युनिटदरम्यान वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठीचे दर प्रति युनिट ११.६० रुपयांवरून ९.३० रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

Ninad Vijayrao Deshmukh

TwittereMail

निनाद देशमुख हिंदुस्तान टाइम्स-मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून २०२२ पासून कार्यरत आहे. निनादने पुणे विद्यापीठातून एमए (जर्नलिझम) शिक्षण घेतले आहे. पुण्यातील केसरी वृत्तपत्रातून २००७ मध्ये बातमीदार म्हणून करियरची सुरूवात. २००९ ते २०२२ पर्यंत लोकमत, पुणे येथे वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केले. निनादला डिफेन्स, सायन्स, अंतराळ विज्ञान, आंतरराष्ट्रीय राजकारण विषयांची विशेष आवड आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर