मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahavitaran : वीजचोरांच्या विरोधात महावितरण आक्रमक; ३ दिवसात पकडली तब्बल २.५० कोटींची वीजचोरी

Mahavitaran : वीजचोरांच्या विरोधात महावितरण आक्रमक; ३ दिवसात पकडली तब्बल २.५० कोटींची वीजचोरी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Nov 22, 2022 12:08 PM IST

electricity theft : वीजचोरी करणाऱ्या वीज ग्राहकांच्या विरोधात महावितरण आक्रमक झाली असून गेल्या एका आठवड्यात कोकण, पुणे, औरंगाबाद व नागपूर परिक्षेत्रातील विविध ठिकाणी घालण्यात आलेल्या धाडीमध्ये १९८ वीजचोरांना महावितरण ने दणका दिला आहे.

वीज चोरी
वीज चोरी (HT)

पुणे : राज्यातील वीजचोरांविरोधात महावितरण आक्रमक झाले आहेत. गेल्या एका आठवड्यात कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर परिक्षेत्रातील विविध ठिकाणी घालण्यात आलेल्या धाडीत तब्बल १९८ वीजचोरांना दणका देत तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली आहे. यात सर्वाधिक १० वीजचोऱ्या एकट्या ठाणे शहरातीलआहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मोठ्या प्रमाणात विजेचा वापर करूनही वीज ग्राहकास कमी रकमेचे देयक कसे जाते, अशा ग्राहकांविरूध्द कारवाई करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले होते. त्यानुसार मोठ्या प्रमाणात विजेचा वापर करणाऱ्या आणि त्याचे बिल टाळण्यासाठी वीजचोरांनी त्यांच्याकडे असलेल्या मीटरमध्ये फेरफार करत होते. या चोरांना पकडण्यासाठी महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकाने मीटरची तपासणी करण्यासाठी विविध पथके तयार केली. या पथकांनी नागपूर, औरंगाबाद, पुणे व कोंकण परिक्षेत्रातील विविध ठिकाणी धाडी टाकून जास्त वीज वापर असलेल्या मात्र कमी वीजबिल येणाऱ्या वीज ग्राहकांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत.

या सर्व मीटरची तपासणी केली असता जवळपास सर्वच वीज ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. हे सर्व मीटर जप्त करून त्याची प्रयोग शाळेत तपासणी केली असता यासर्वच १९८ वीजग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. एकट्या कोंकण परिक्षेत्रातील वीजचोरीचे मुल्याकंन करण्यात आले असून येथील वीजग्राहकांनी एकूण ७ लाख ४४ हजार ११४ युनिटचा अनधिकृतपणे वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. या वीजचोरीची अनुमानित रक्कम १ कोटी २२ लाख रुपये असून या ग्राहकांना वीजचोरीचे देयक देण्यात आले आहे. उर्वरित पुणे, ओरंगाबाद व नागपूर परिक्षेत्रात पकडण्यात आलेल्या वीजचोरीच्या मुल्यांकनांची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे.

सदर वीजचोरीची रक्कम भरण्यासाठी ग्राहकांना नियमानुसार मुदत देण्यात आली असून विहित कालावधीत या ग्राहकांनी वीजबिलाची रक्कम भरली नाही तर त्यांच्याविरूध्द विद्युत कायदा- २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

 

IPL_Entry_Point

विभाग