mahavitaran Electricity Price Hike From 1st April : राज्यात भर उन्हात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या वाऱ्यात मतदार राजाला खुश करण्यासाठी सरकार अनेक घोषणा करत आहेत. मात्र, असे असतांना महावितरणने मात्र, ऐन उन्हाळ्यात वीजदरवाढीचा शॉक सर्व सामान्य नागरिकांना दिला आहे. तब्बल ७.५० टक्क्यांनी ही वीजदरवाढ करण्यात आली आहे. यात जर इंधन अधिभार जोडला तर ही दरवाढ तब्बल १० टक्क्यांपर्यंत जाते. यामुळे आता वीज ग्राहकांच्या खिशातून किमान ५० रुपये अतिरिक्त जाणार आहेत.
राज्य वीज नियामक आयोगाने (State Visa Regulatory Commission) गेल्या वर्षी वीज दर वाढ करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही नवी दरवाढ महावितरणने आता लागू केली आहे.
राज्यात भर उन्हात निवडणुकिके वारे वाहत असतांना सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आता चाप बसणार आहे. वीजदर वाढीमुळे नागरिक घामाघूम होणार आहेत. महाराष्ट्राच्या महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) नवे डॉ निश्चित केले असून २० टक्क्यांनी ही दर वाढ झाली आहे. विजेचे दर वाढले असले तरी कमी उत्पन्न गटातील लोकांवर याचा परिणाम होणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने विजेच्या दरात कीमान १० ते २० टक्याने वाढ केली आहे. एमईआरसीने या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात नव्या टेरिफ प्लॅनची माहिती दिली आहे. यात पूर्वी नागरिकांना ० ते १०० युनिटसाठी ५.५८ रुपये प्रति युनिट दराने बिल द्यावे लागत होते. तर आता प्रति युनिट ५.८८ रुपये मोजावे लागणार आहेत. प्रति युनिट मागे आता ३० पैसे जास्तीचे भरावे लागणार आहेत.
वीज ग्राहकांना आता १०१ ते ३०० युनिटसाठी ११ रुपये ४६ पैसे अतिरिक्त मोजावे लागतील. तर, ३०१ ते ५०० युनिटसाठी १५ रुपये ७२ पैसे द्यावे लागणार आहेत. तर ५०० युनिट च्या वर १७ रुपये ८१ पैसे द्यावे लागणार आहेत. नव्या टेरिफ प्लॅन अंतर्गत, नागरिकांना प्रति युनिट ३० पैसे जास्तीचे मोजावे लागणार आहेत.
संबंधित बातम्या