Maharashtra Vidhansabha Election : राज्यात विधानसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा असलेल्या पुणे जिल्ह्यात देखील महायुतीने बाजी मारली आहे. १८ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर केवळ २ जागांवर महाविकास आघाडीला समाधान मानावे लागले आहे. जिल्ह्यात अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती तालुक्यात अजित पवार यांनी पुतण्या युगेंद्र पवार यांचा दारुण पराभव केला आहे. तर कसबा पेठेत जायंट किलर ठरलेले कॉँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांची जादू या मतदार संघात चालली नाही. पोटनिवडणुकीत पराभूत झालेले हेमंत रासने या निवडणुकीत मोठा मताधिक्याने विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादीचा दबदबा असलेल्या पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघामध्ये ६१.०५ टक्के मतदान झाले होते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मतदानाचा उत्साह जास्त दिसून आला. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार भाजप-शिवसेना शिंदे पक्षाच्या सरकारमध्ये सामील झाले. पुणे जिल्ह्यात यंदा प्रामुख्याने अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत दिसून आली आहे. याशिवाय भाजप विरुद्ध काँग्रेस असे चित्र काही ठिकाणी होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जिल्ह्यातील काही मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. मात्र, प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांमध्येच लढत झाली. यात महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण प्रभाव झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदार संघाकडे सर्व देशाचे लक्ष लागले होते. बारामतीत काय होईल? याकडे सर्वांचं लक्ष होतं. या मतदार संघातील चित्र स्पष्ट झालं आहे. अजित पवार हे मोठ्या मतांनी विजयी झाले आहेत. अजित पवार यांना अखेरपर्यंत १ लाख ९ हजार ८४८ मते मिळाली आहे. तर शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांना केवळ ४८ हजार २१२ मते मिळाली आहेत. या प्रतिष्ठेच्या लढतीत अजित पवार यांनी विजय मिळवला आहे.
पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने यांनी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबापेठ मतदार संघात विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला आहे. पोटनिवडणुकीत गमावलेला बालेकिल्ला भाजपने पुन्हा खेचून आणला आहे. पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांचा पराभव झाला होता. मात्र, या निवडणुकीत त्यांनी धंगेकर यांचा पराभव करून विजय खेचून आणला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच रासने यांनी घेतलेली होती. ती आघाडी ही त्यांनी शेवटपर्यंत टिकून ठेवत विजय मिळवळला.
कसबापेठे
हेमंत रासने विजयी - काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पराभूत
कोथरूड
भाजपचे चंद्रकांत पाटील विजयी - उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे पराभूत
खडकवसला
भाजपचे भीमराव तापकिर विजयी - राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रमेश दोडके पराभूत
शिवाजीनगर
भाजपचे सिद्धार्थ शिरोळे विजयी - काँग्रेसचे दत्ता बहिरट पराभूत
हडपसर :
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चेतन तुपे विजयी - राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रशांत जगताप पराभूत
पुणे छावणी
भाजपचे सुनील कांबळे विजयी : काँग्रेसचे रमेश बागवे पराभूत
वडगाव शेरी
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बापू पठारे विजयी - राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील टिंगरे पराभूत
इंदापूर
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे दत्तात्रय भरणे विजयी : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील पराभूत
दौंड
भाजपचे राहुल कुल विजयी - राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रमेश थोरात पराभूत
बारामती
राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार विजयी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युगेंद्र पवार पराभूत
जुन्नर
अपक्ष उमेदवार शरद सोनवणे विजयी : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अतुल बेनके, शरद पवार पक्षाचे सत्यशील शेरकर पराभूत
खेड आळंदी
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाबाजी काळे विजयी - राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप मोहिते पराभूत
आंबेगाव
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील विजयी - राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे देवदत्त निकम पराभूत
शिरूर
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माऊली कटके विजयी - राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अशोक पवार पराभूत
भोर वेल्हा मुळशी
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे चंद्रकांत मांडेकर विजयी : काँग्रेसचे संग्राम थोपटे पराभूत
पुरंदर
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विजय शिवतारे विजयी : काँग्रेसचे संजय जगताप पराभूत
मावळ
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सुनील शेळके विजयी - बंडखोर बापू भेगडे पराभूत
भोसरी
भाजपचे महेश लांडगे विजयी - राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अजित गव्हणे पराभूत
पिंपरी
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अण्णा बनसोडे विजयी - राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुलक्षणा शिलवंत पराभूत
चिंचवड
भाजपचे शंकर जगताप विजयी - राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राहुल कलाटे पराभूत
पर्वती
भाजपच्या माधुरी मिसाळ विजयी - राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अश्विनी कदम पराभूत