मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  DA hike 2024 : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात घसघशीत वाढ

DA hike 2024 : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात घसघशीत वाढ

Jul 11, 2024 12:14 AM IST

Maharastra government DA hike : राज्य शासनाच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. हीवाढ वर्षातून२वेळा वाढ करण्यात येत असते.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ (संग्रहित छायाचित्र)
सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ (संग्रहित छायाचित्र)

Maharastra goverment DA hike : महायुती सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ केली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करत ४६ टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर नेला आहे. १ जानेवारी २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने महागाई भत्ता वाढ लागू केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विधानसभा निवडणुकीआधी सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.  १  जानेवारी २०२४ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४६ टक्क्यांवरून ५० टक्के करण्यात आला आहे. महागाई भत्त्यातील वाढ दिनांक १ जानेवारी २०२४ ते दिनांक ३० जून २०२४ या कालावधीतील थकबाकीसह जुलै २०२४ महिन्याच्या वेतनासोबत देण्यात येईल. 

राज्य शासनाच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ वर्षातून २ वेळा वाढ करण्यात येत असते. १ जानेवारी २०२४ मध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. २३  नोव्हेंबर २०२३ मध्ये महागाई भत्ता ४२  टक्क्यांवरुन  ४६ टक्के करण्यात आला होता. आता पुन्हा त्यात ४ टक्क्यांची वाढ करत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५० टक्क्यांवर नेला आहे. 

अनेक घटकांमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सतत बदलत असतात. महागाई वाढत असते. कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करता यावा यासाठी महागाई भत्त्याची निर्मिती करण्यात आली होती. केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारक यांना महागाई भत्ता दिला जातो. सरकारकडून दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्याचा आढावा घेऊन त्यात वाढ केली जाते.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना १८ महिन्याचा महागाई भत्ता थकबाकीसह मिळणार -

देशातील १ कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना मागील १८ महिन्यांचा डीए थकबाकीसह (arears) मिळणार आहे. केंद्र सरकारकडे सरकारी कर्मचाऱ्यांना १८ महिन्यांचा डीए देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात एरियर देण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

 

WhatsApp channel
विभाग