Weather Updates: राज्यातून मान्सून परतण्याच्या मार्गावर असताना आज (२३ ऑक्टोबर २०२४) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, उर्वरित राज्यातील तापमान चढ-उतार पाहायला मिळू शकतो.
राज्यात काही भागांत दिवसा उन आणि रात्री पाऊस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर येथे आज वादळी वारे आणि विजांसह पावसांच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर, मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्यात ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.तसेच काही भागात ऑक्टबर हिटचा तडाखा देखील जाणवू शकतो. दरम्यान गुरुवारपासून राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. मात्र पुढील काही दिवस ढगाळ वातावरण असेल असे हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यात पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात घसरण झाली आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळपर्यंत वाशिम येथे सर्वाधिक ३४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर, सोलापूर आणि सांताक्रझ येथे ३४ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांमुळे दक्षिण भारतात पाऊस पडतो. या ईशान्य, पूर्वेकडील वाऱ्यांमुळे २६ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह किरकोळ पाऊस राहील. तर, येत्या १ नोव्हेंबरपर्यंत जळगाव, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, उत्तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशीम, अमरावती, बुलडाणा, अकोला, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांत पावसाची मुख्यतः उघडीप राहील.
गुरुवार: मुंबईचे कमाल तापमान ३०.७३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २७.९६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
शुक्रवार: मुंबईत २५ ऑक्टोबर २०२४ रोजी कमाल तापमान २९.९९ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २७.५७ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
शनिवार: २६ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईचे कमाल तापमान २९.३३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २७.१ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
रविवार: मुंबईत २७ ऑक्टोबर २०२४ रोजी कमाल तापमान २९.४६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २७.२५ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.