मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : आगीशी खेळू नका; मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारला खडसावलं

Eknath Shinde : आगीशी खेळू नका; मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारला खडसावलं

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 29, 2022 10:38 AM IST

Eknath Shinde on Border Dispute : कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांनी मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कर्नाटक सरकारला खडेबोल सुनावले आहे.

CM Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute
CM Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute (PTI)

CM Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटकचे शिक्षणमंत्री अश्वत्थ नारायण यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केल्यानंतर आता राज्यात राजकीय वादंग पेटलेलं आहे. विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला सीमावादावरून घेरलं आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारचा निषेध केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कर्नाटक सरकारच्या महाराष्ट्रद्वेषी भूमिकेचा निषेध करत मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

सीमाप्रश्नावर महाराष्ट्रानं नेहमीच संयमाची भूमिका घेतलेली आहे. परंतु कर्नाटक सरकार सातत्यानं सीमाभागातील मराठी भाषिकांवर अत्याचार असल्यानं त्यांनी आम्हाला आव्हानाची भाषा करून आगीशी खेळण्याचा प्रयत्न करू नये. मुंबई कुणाच्या बापाची नाही तर मराठी माणसाची आहे. जेव्हा-जेव्हा शहरावर संकटं आली तेव्हा मुंबईकरांनी एकत्र येऊन लढा दिला असून त्यामुळं कर्नाटक सरकारच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक सरकारला स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे.

कर्नाटकच्या मंत्र्यानं मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या समझौत्याचं कर्नाटक पालन करत त्यांना तंबी देण्यासाठी शहांची भेट घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सीमाप्रश्नावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सातत्यानं महाराष्ट्रातील जनतेच्या मनात चीड आणणारं वक्तव्य करत आहेत. मात्र महाराष्ट्रानं दाखवलेल्या संयमाची परिक्षा घेऊन दुर्दैवानं कर्नाटक सरकार तेथील मराठी माणसावर अत्याचार करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

WhatsApp channel