मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Session : ‘स्वाधार’च्या धर्तीवर OBC विद्यार्थ्यांसाठी योजना लागू होणार, सरकारची घोषणा

Nagpur Session : ‘स्वाधार’च्या धर्तीवर OBC विद्यार्थ्यांसाठी योजना लागू होणार, सरकारची घोषणा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 29, 2022 07:06 PM IST

Devendra fadnavis announce swadhar Like scheme : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली की, स्वाधार योजनेच्या धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी योजना लागू केली जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांच्या राहण्याचा, भोजनाचा व शिक्षणाच्या खर्चाचा समावेश आहे.

‘स्वाधार’च्या धर्तीवर  OBC  विद्यार्थ्यांसाठी योजना लागू होणार
‘स्वाधार’च्या धर्तीवर  OBC  विद्यार्थ्यांसाठी योजना लागू होणार

Nagpur Winter Session : एससी व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी असणारी स्वाधार योजना आता ओबीसी विद्यार्थ्यांनाही लागू करण्यात येणार आहे. अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यात पाच वसतिगृहे सुरू व्हावीत, यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून लवकरच ही वसतिगृहे सुरू करण्यात येणार असल्याचेही फडणवीसांनी विधानसभेत म्हटले.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की,'स्वाधार' सारखी योजना आता ओबीसीसाठी ही सुरू केली जाईल. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या राहण्याचा, जेवणाचा आणि शिक्षणाचा खर्च त्यांच्या बँक अकाउंटला डिबीटीद्वारे पाठवला जाईल. या योजनेचा लाभ राज्यात ३१ जिल्ह्यातील ६०० ओबीसी विद्यार्थ्यांना होणार आहे. पीएचडीसाठी अनुसूचित जाती, मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. आता अशीच फेलोशिप आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

ओबीसी वसतिगृह खासगी संस्थांना नव्हे तर स्वयंसेवी संस्थांना चालवण्यात दिली जातील. अशी योजना समाजकल्याण विभागामार्फत सुरू आहे. खासगी व्यक्तीकडे कोणतीही जबाबदारी देण्यात येणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र सरकारने २०१६-१७ मध्येभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरूकेली होती. या योजनेंतर्गत इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक,तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करूनदिले जाते.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या