Maharashtra Whether Update : राज्यात मॉन्सूनने जोरदार धडक दिली आहे. मुंबई पुण्यात पावसाने तूफान हजेरी लावण्याने पहिल्याच पावसात येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज देखील राज्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रतील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदूर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सातारा, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळ, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुण्यामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्येही पुढील 3 दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
नैऋत्य मौसमी पावसाने मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, उत्तर अरबी समुद्राचा काही भाग, मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग व्यापला आहे. वातावरणाच्या खालच्या थरात मराठवाडा व लगतच्या भागावर चक्रिय स्थिती तयार झाली आहे. आज १० तारखेला कोकण, गोवा येथे बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र येथे बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर १० व ११ तारखेल कोकण, गोवामध्ये व मध्य महाराष्ट्र येथे बहुतेक ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भ येथे काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणात सिंधुदुर्ग येथे काही ठिकाणी जोरदार पावसाची तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात कोल्हापूरच्या घाट विभागात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी व साताऱ्याच्या घाट विभागात काही तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. म्हणून या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, रायगड व पुणे येथे चाळीस टे पन्नास किलोमीटर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे म्हणून यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अकरा तारखेला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग व पुणे सातारा कोल्हापूरचा घाट परिसरात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
उर्वरित राज्यात १० आणि ११ तारखेला मेघ गर्जना वीजांचा कडकडाट तसेच ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे व अहण्याची शक्यता आहे. तर पुणे व परिसरत आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.