Weather News: महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही भागांत आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्याने अनेक जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, घाट परिसरात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ पडण्याची शक्यता आहे. ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील अनेक भागात मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. नाशिक आणि कोल्हापूमध्ये देखील चांगला पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडसह काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
नडगाव ४९ मिलीमीटर, धसइ ६१६ मिलीमीटर, सरळगाव ६४ मिलीमीटर, कुमभर्ती ४४ मिलीमीटर, बदलापूर ४२ मिलीमीटर, पोयनाड ४२ मिलीमीटर, रामराज ४७ मिलीमीटर, चरी ५१ मिलीमीटर, पनवेल ७४ मिलीमीटर, ओवले ७५ मिलीमीटर, कर्नाळा ७४ मिलीमीटर, तळोजे ६३ मिलीमीटर, कळंब ५४ मिलीमीटर, इंदापूर ५४ मिलीमीटर, निजामपूर ४६ मिलीमीटर, रोहा ४५ मिलीमीटर, नागोठणे ४२ मिलीमीटर, कोलाड ५१ मिलीमीटर, वाकण ५२ मिलीमीटर, खेर्डी ५२ मिलीमीटर, धामनंद ४३ मिलीमीटर, कळकवणे ४३ मिलीमीटर, शिरगांव ४३ मिलीमीटर, भरणे ४६ मिलीमीटर, शिर्शी ४६ मिलीमीटर, दाभीळ ४५ मिलीमीटर, डहाणू ४५ मिलीमीटर, मालयण ४५ मिलीमीटर, साइवन ४५ मिलीमीटर, कसा ४५ मिलीमीटर, तलवड ५० मिलीमीटर, खोडला ४५ मिलीमीटर, तलसरी ४७ मिलीमीटर.
हैदराबादमध्ये मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. हैद्राबादमधील नामपल्ली रोडवर अवजड वाहतूक असल्याचे दृश्य समोर आले. भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 6 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर दरम्यान राज्यात यलो अलर्ट चा अंदाज वर्तवला आहे. राज्यात शनिवारी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ८ सप्टेंबररोजी करीमनगर, पेद्दापल्ली, जयशंकर, मुलुगू आदी ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. रविवारी ९ रोजी राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.