Weather Updates: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Updates: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता

Weather Updates: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता

Updated Oct 31, 2024 06:50 AM IST

Maharashtra Weather Updates: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता (फोटो - पीटीआय)

Maharashtra Weather News: महाराष्ट्रातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून चढ- उतार पाहायला मिळत आहे. बहुतेक जिल्ह्यांत ऑक्टोबर हीटचा चटका जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामाने विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. उर्वरित महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

राज्यात अनेक भागात ऑक्टोबर हिटचा चटका जाणवत आहे. राज्यातील सोलापूर येथे बुधवारी सकाळपर्यंत सर्वाधिक ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर, अकोला आणि वर्धा येथील तापमान ३५ अंश सेल्सिअसवर होते. याशिवाय, अमरावती, डहाणू, नागपूर, परभणी, वाशीम, यवतमाळ येथे ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील सर्वात थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर येथे सर्वात कमी १७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात बुधवारी नोंदवलेले कमाल आणि किमान तापमान

पुणे- ३३.७ (१९.२), अहिल्यानगर- ३१.९ (१७.७), जळगाव- ३३.८ (१८.२), कोल्हापूर- ३१.४ (२२.७), महाबळेश्वर- २९.३ (१७), मालेगाव- ३२.२ (२०), नाशिक- ३३ (१८.९), निफाड- ३२.६ (१७.५), सांगली- ३३.२ (२१.१), सातारा- ३३.२ (१९.५), सोलापूर- ३५.८ (२३.६), सांताक्रूझ- ३३.३ (२४.५), डहाणू- ३४.६ (२५), रत्नागिरी- ३२.९ (२४.८), छत्रपती संभाजीनगर- ३३.४ (१९), बीड- ३१.४ (१८.३), धाराशिव- ३२.८, परभणी ३४ (२१.३), अकोला- ३५.१ (२१.३), अमरावती- ३४.८ (२१.६), भंडारा- ३०(-), बुलडाणा- ३१.२ (२०.५), ब्रह्मपुरी- ३२.६ (२२.९), चंद्रपूर- ३३.६ (२०.८), गडचिरोली- ३३.० (२१.६), गोंदिया- ३३.८ (२१.६), नागपूर- ३४.६ (२३.१), वर्धा- ३५.० (२२.६), वाशीम- ३४, यवतमाळ- ३४ (२०).

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर