Maharashtra weather Update: राज्यात हुडहुडी! बोचरी थंडी, गार वाऱ्यांमुळे तापमानात मोठी घट! IMD ने दिला शीत लहरीचा अलर्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra weather Update: राज्यात हुडहुडी! बोचरी थंडी, गार वाऱ्यांमुळे तापमानात मोठी घट! IMD ने दिला शीत लहरीचा अलर्ट

Maharashtra weather Update: राज्यात हुडहुडी! बोचरी थंडी, गार वाऱ्यांमुळे तापमानात मोठी घट! IMD ने दिला शीत लहरीचा अलर्ट

Dec 15, 2024 08:31 AM IST

Maharashtra Weather Updates : राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. शनिवारी तापमानात मोठी घट झाली असून पुढील काही दिवस थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात हुडहुडी! बोचरी थंडी, गार वाऱ्यांनी तापमानात मोठी घट! IMD ने दिला शीत लहरीचा अलर्ट
राज्यात हुडहुडी! बोचरी थंडी, गार वाऱ्यांनी तापमानात मोठी घट! IMD ने दिला शीत लहरीचा अलर्ट (HT_PRINT)

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात थंडी वाढली असून शेकोट्या पेटू लागल्या आहेत. शनिवारी तापमानात मोठी घट झाली. तर पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शनिवारी राज्यातील सर्वात कमी तापमान धुळ्यात नोंदवले गेले. या ठिकाणी ४.४ अंश सेल्सियस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली. तर जळगाव जिल्ह्यात ८.४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील थंड हवेच्या प्रवाहात वाढ झाली असून त्यामुळे राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यात कडक्याची थंडी व धुके पडण्याची शक्यता आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार उत्तेरकडील थंड वाऱ्यांचा जोर वाढला आहे. तर दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे कमी दाबचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या सोबतच लक्षद्वीप व मालदीव भागावर देखील कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली आहे.

पुण्यात थंडीचा कडाका वाढला

पुण्यात शनिवारी थंडीचा कडाका वाढला. पुण्यात शनिवारी १०.१ डिग्री सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर रविवारी सकाळी देखील मोठ्या प्रमाणात गारठा पडला असून धुके पडले होते. थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र पुण्यात होते. पुण्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार असून तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पुणे, पिंपरी- चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यातील किमान तापमानात मोठी घट झाली आहे.

उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील किमान तापमानात मोठी घड झाली आहे. काही जिल्ह्यात तापमान हे ९ ते १० अंशांवर आले आहे. पुढील काही दिवसांत राज्यात थंडीची लाट आणखी सक्रिय होणार आहे. ही लाट १८ डिसेंबर पर्यंत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात देखील थंडी वाढली असून पुढील काही दिवसांत थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून यामुळे कमाल व किमान तापमानात कोणताही बदल होणार नसला तरी थंडी वाढणार आहे. धुळ्यासह मध्य महाराष्ट्रातील निफाड, जळगाव, अहिल्यानगर, जेऊर, नाशिक, मालेगाव, मराठवाड्यातील परभणी, विदर्भातील गोंदिया, वर्धा, नागपूर येथे तापमान १० अंशांच्या खाली नोंदवण्यात आले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर