Maharashtra Weather Update : राज्यात पावसाची विश्रांती! विदर्भ वगळता इतर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला-maharashtra weather updates intensity of rain will be less for next four five days ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : राज्यात पावसाची विश्रांती! विदर्भ वगळता इतर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाची विश्रांती! विदर्भ वगळता इतर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

Sep 04, 2024 07:02 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. विदर्भ वगळला सर्व जिल्ह्यात आज हवामान सामान्य राहणार आहे. काही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 राज्यात पावसाची विश्रांती! विदर्भ वगळता इतर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला
राज्यात पावसाची विश्रांती! विदर्भ वगळता इतर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला (HT_PRINT)

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांत मराठवाडा विदर्भात पावसाने कहर केला होता. मराठवड्यातील काही जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पावसाचा जोर हा ओसरला आहे. विदर्भ वगळला राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. आज विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात पुढील काही दिवस पावसाने उघडीप घेतली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व विदर्भात चंद्रपूरजवळ सोमवारी केंद्रित झालेले अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता पश्चिम भागाकडे सरकले आहे. त्यामुळे विदर्भासह मराठवाड्यात पुढील चार-पाच दिवस पावसाचा जोर कमी झाला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. येथील हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी आज पाऊस होऊ शकतो.

नैऋत्य मौसमी वारे ही काहीसे दक्षिणेकडे वळले आहेत. अरबी समुद्रात संपूर्ण पश्चिम किनारपट्टी व समांतर दक्षिणोत्तर ऑफ-शोअर ट्रफ सक्रिय आहे. त्यामुळे अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून दीड किमी उंचीपर्यंत ताशी ४८ किमी वेगाने येणाऱ्या आर्द्रतायुक्त पश्चिमी वाऱ्याचा वेग मंदावला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात पावसाचा जोर आजही कायम आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आजही यलो अलर्ट देण्यात आला आहे. आर्द्रता वाढल्यामुळे काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. गुरुवारी (५ सप्टेबर) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात पावसाचा जोर वधू शकतो. पुढील चार दिवस राज्यात हलक्या ते मध्यम सरी कोसळणार आहेत.

पुण्यात आज हवामान ढगाळ राहणार आहे. तर काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.