मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Updates: पुणे, नाशिक, अहमदनगरसह ६ जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

Weather Updates: पुणे, नाशिक, अहमदनगरसह ६ जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 05, 2024 10:49 AM IST

Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात कोणत्या भागात गुलाबी थंडी पसरली आहे. तर, कुठे अवकाळी पाऊस झाला? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Maharashtra Rain and Weather Update
Maharashtra Rain and Weather Update (HT)

Weather Updates News In Marathi: अवकाळी पावसाने गुरुवारी सांगली आणि बुलढाणा जिल्ह्याला झोडपून काढले. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू, तुर, मका, हरभरा, गुरांचा चाऱ्याचे नुकसान झाल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनग या ६ जिल्ह्यात आज (५ जानेवारी २०२३) आणि उद्या (६ जानेवारी २०२३) मेगगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर येथे शुक्रवारी तुरळक पाऊस पडू शकतो. तर, धुळे, नंदुरबार येथेही रविवारपर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. याचबरोबर दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी पुढील ७२ तासांत हलक्या पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय.

सांगली शहर आणि बुलढाणा जिल्ह्यात गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली. बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील आव्हा, तळणी, लिहा, पिंप्री गवळी या भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू, तुर, मका, हरभरा, गुरांचा चाऱ्याचे नुकसान झाले आहे.

गुरुवारी नोंदवलेल्या तापमानानुसार, महाराष्ट्रात सर्वात जास्त थंडी गोंदिया आणि धुळे जिल्ह्यात जाणवली. गोंदिया आणि धुळ्यात तापमान अनुक्रमे १३.५ आणि १३.६ अंश सेल्सिअस असे तापमान नोंदवण्यात आले. याशिवाय, पुणे (१५.९), जळगाव (१६.९), कोल्हापूर (१९.७), महाबळेश्वर (१५.५), नाशिक (१५.९), निफाड (१३.५), सांगली (१९.९), सातारा (१६.५), सोलापूर (१९), मुंबई (१९), डहाणू (१८.५), रत्नागिरी (२१.२), छत्रपती संभाजीनगर (१६.४), नांदेड (१७.८), परभणी (१६.४), अकोला (१७.५), अमरावती (१७.१), बुलडाणा (१७.५), ब्रह्मपुरी (१५.४), चंद्रपूर (१५.२), गडचिरोली (१४.८), नागपूर १६ अंश सेल्सिअस आणि वर्ध्यात १६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

WhatsApp channel