Weather News: बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र ओसरू लागताच राज्यात अनेक भागांत उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आज उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भात जोरदार पाऊस पडले, असा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, सिंधुदु्र्ग, जळगाव, गडचिरोलीसह अनेक भागांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर येथे जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.
दरम्यान, महाराष्ट्रात पावसाने उघडीप घेतल्याने अनेक भागांत उन्ह उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मंगळवारी नागपूर आणि जेऊर येथे ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर, बहुंताश ठिकाणी तापमानाचा पारा ३० ते ४० अंशाच्या दरम्यान आहे.
मंगळवारी राजधानीच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने दिवसभर शहरातील रस्त्यांवरील वाहतूक मंदावली आणि शहराच्या पश्चिम आणि उत्तर भागातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले. भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी शहरात आणखी पाऊस आणि ताशी ३० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली असून शुक्रवारपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे.
दिल्लीच्या हवामानाचे प्रतिनिधी मानल्या जाणाऱ्या सफदरजंग हवामान केंद्रात मंगळवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत ५.६ मिमी पावसाची नोंद झाली. याच कालावधीत पालम हवामान केंद्रात १०.५ मिमी, लोधी रोड स्थानकात १ मिमी, रिज स्थानकात २ मिमी आणि आयानगर स्थानकात १.८ मिमी पावसाची नोंद झाली. पीतमपुरा स्थानकात या कालावधीत सर्वाधिक म्हणजे २७ मिमी पावसाची नोंद झाली.