Maharashtra Weather Update : राज्यात कोकण, विदर्भासह मराठवाड्यात बरसणार; IMD ने दिला 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : राज्यात कोकण, विदर्भासह मराठवाड्यात बरसणार; IMD ने दिला 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात कोकण, विदर्भासह मराठवाड्यात बरसणार; IMD ने दिला 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Published Oct 08, 2024 06:01 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात आज कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात कोकण, विदर्भासह मराठवाड्यात बरसणार; IMD ने दिला 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यात कोकण, विदर्भासह मराठवाड्यात बरसणार; IMD ने दिला 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यातील वातावरणात बदल होत असतांना कुठं जोरदार पाऊस तर कुठं ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात पाऊस पडतो आहे. तर काही शहरात ऑक्टोबर हिट जाणवत आहे. दरम्यान, आज आणि पुढील काही दिवस राज्यातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात परतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. आज सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट व पाऊस पडण्याची शक्यता आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस गुजरात आणि मध्य प्रदेशच्या उर्वरित भागातून तर महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. आज गोव्यासह संपूर्ण राज्यात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर त्यानंतरच्या दोन दिवस कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यास हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर आठ व नऊ ऑक्टोबरला वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात व नऊ तारखेला बुलढाणा जिल्ह्यात आणि दहा तारखेला बुलढाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने वरील सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यात असे असेल हवामान 

पुणे आणि अस्वच्छ परिसरासाठी आज आकाश सामान्यतः ढगावर राहण्याची शक्यता आहे तर उद्या ८ ऑक्टोबर पासून पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगावर राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची व मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात काही जिल्ह्यात  मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  विदर्भातील काही  जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात उद्या नागपूर मध्ये देखील ढगाळ वातावरण राहणार आहे.  तर मराठवाड्यातील अनेक भागात जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. बीड, लातूर, परभणी या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर