Maharashtra Weather Updates Today: महाराष्ट्रात पावसाळी वातावरणामुळे यंदा थंडीला उशिराने सुरुवात झाली. पण आता दिवाळीनंतर राज्यातील बहुतांशी भागांमध्ये थंडी पडायला सुरुवात झाली.उत्तर महाराष्ट्रात तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत घाली घसरले आहे. तर, कोकणासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.
उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळले आहे. आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. तर, आज पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असे म्हटले आहे.
पुणे ३०.४ (१४.६) सेल्सिअस, अहिल्यानगर ३० (१५.३) सेल्सिअस, धुळे (१२.०) सेल्सिअस, जळगाव ३२.४ (१५.४) सेल्सिअस, कोल्हापूर ३०.६ (१९.५) सेल्सिअस, महाबळेश्वर २५.३ (१५) सेल्सिअस, मालेगाव २९.४ (१५.८) सेल्सिअस, नाशिक ३०.१ (१३.४) सेल्सिअस, निफाड २९.९ (११.८) सेल्सिअस, सांगली ३१.८ (१८.६) सेल्सिअस, सातारा ३०.५ (१६.५) सेल्सिअस, सोलापूर ३४.८ (२०.६) सेल्सिअस, सांताक्रूझ ३५.१ (२०.४) सेल्सिअस, डहाणू ३५.८ (१९.४) सेल्सिअस, रत्नागिरी ३५.२ (२२.२) सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर ३१ (१५) सेल्सिअस, धाराशिव ३१ (१९.४) सेल्सिअस, परभणी ३१.४ (१६.१) सेल्सिअस, परभणी कृषी विद्यापीठ ३१.५ (१४.१) सेल्सिअस, अकोला ३३.३ (१७.६) सेल्सिअस, अमरावती ३२.४ (१६.७) सेल्सिअस, बुलडाणा ३१ (१६.८) सेल्सिअस, ब्रह्मपुरी ३३.८ (१६.८) सेल्सिअस, चंद्रपूर ३१.८ (१६.२) सेल्सिअस, गडचिरोली ३२ (१६) सेल्सिअस, गोंदिया ३१.४ (१६.२) सेल्सिअस, नागपूर ३२.१ (१६.२) सेल्सिअस, वर्धा ३२.१ (१६) सेल्सिअस, वाशीम ३४.६ सेल्सिअस, यवतमाळ ३१.२ (१५) सेल्सिअस.