मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

May 20, 2024 07:28 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी राज्याच्या अनेक भागाला मुळसाधार पावसाने झोडपले.

राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी राज्याच्या अनेक भागाला मुळसाधार पावसाने झोडपले.
राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी राज्याच्या अनेक भागाला मुळसाधार पावसाने झोडपले. (HT)

Maharashtra Weather Update : राज्यात रविवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत अनेक ठिकाणी मोठे नुकसान केले. आज देखील राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. राज्यात आज मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत आज सहा मतदार संघात पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या मतदानावर या उष्णतेच्या लाटेचा परिमाण होणार आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

Lok sabha Election 5 phase voting live : रायबरेली, अमेठीसह ४९ जागांवर आज मतदान, पाचव्या टप्प्यात 'या' दिग्गजांचा समावेश

नैऋत्य मौसमी वारे मालदीव व कमोरीयन एरियाचा काही भाग तसेच दक्षिण बंगालचा काही भाग निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात आज १९ मे रोजी दाखल झाले आहे. वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा उत्तर प्रदेश ते मध्य महाराष्ट्रापर्यंत जात आहे. मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर एक वाऱ्याची चक्रीय स्थिती म्हणजे सायकलोनिक सर्क्युलेशन सक्रिय आहे. तर आणखीन एक द्रोणिका रेषा मध्य महाराष्ट्रावरील असलेल्या चक्रीय स्थिती मधून जाऊन ती तमिळनाडू पर्यंत जात आहे.

कोकणात उष्ण व दमट वातावरण

कोकणात आज व पुढील दोन दिवस बऱ्याच जिल्ह्यात मध्ये वातावरण उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी २२ मे पासून ते २३ मे पर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. सिंधुदुर्गमध्ये २१ व २२ मे रोजी मेघगर्जना विजांचा कडकडात व वादळीवारासह पावसाची शक्यता आहे तर २० व २३ मे ला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, इस्रायलसोबत तणाव सुरू असताना दुर्घटना

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही जिल्ह्यात अवकाळीचा यलो अलर्ट

मध्य महाराष्ट्रात आज बहुतांश जिल्ह्यात मेघ गर्जना विजांचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. २१ व २२ मे रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली व सोलापूर मध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात आज व २१ व २२ मे ला यलो अलर्ट घेण्यात आला आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात २२ मे पर्यंत व १९ व २० मे रोजी अकोल्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये व २१ व २३ मे रोजी अकोल्यात मेघगर्जना विजांचा कडकडात व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाडा व अकोल्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Priyanka Gandhi interview: 'देशभरात भाजपविरोधात लाट; मोदींनी कॉंग्रेसचा जाहीरनामा वाचून बोलावेः प्रियांका गांधी

पुण्यात आजही पावसाची शक्यता

पुणे व परिसरात आज व २१ ते २५ मे पर्यंत आकाश मुख्यता निरभ्र राहणार आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. २० मे रोजी म्हणजे उद्या आकाश मुख्यता निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे.

राज्यभरात हलक्या पावसाची शक्यता

पुढील दोन दिवस कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह प्रति तास ४० ते ५० ते वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४