Maharashtra Weather Update : राज्यावर आज देखील मुसळधार पावसांच संकट कायम आहे. मुंबई, पुण्यासह सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात कोकणात, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहून वीजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिव जिल्ह्यात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, गोंदिया, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांत देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दक्षिण बांगलादेश व लगतच्या भागावर असलेले कमी क्षेत्र आज मध्य बांगलादेश व नगरच्या भागावर आहे. तसेच आज पूर्व मध्य अरबी समुद्र व कर्नाटक किनारपट्टी पर्यंत हा कमी दाबाचा पट्टा असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, गोव्यासह संपूर्ण राज्यात पुढील चार ते पाच दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि ठाण्यात बऱ्याच प्रतिक्षेनंतर सोमवारी व मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. यामुळे मुंबई आणि ठाण्यातील नागरिकांना वाढत्या उकड्यापासून दिलासा मिळाला आहे.
पुणे व आसपास आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस पुणे व आसपास परिसरात यलो अलर्ट देण्यात आला आहे. २२ व २३ ऑगस्टला पुणे व परिसरात ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.