Maharashtra Weather update : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाचे सावट होते. यामुळे वातावरणावर मोठा परिणाम पाहायला मिळाला. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उष्णता तर काही ठिकाणी थंडी असे संमिश्र वातावरण राज्यात होते. मात्र, आता कमी दाबाचा पट्टा दूर झाल्याने राज्यातील पावसाची शक्यता देखील कमी झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी तापमान वाढले आहे. सकाळी थंडी, दुपारी उष्णता आणि रात्री थंडी असे वातावरण सध्या राज्यात आहे. पुढील काही दिवसांत राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढत असून किमान तापमानात घट होत आहे.
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये सातारा, पुणे आणि कोल्हापुरातील घाटमाथ्यावरील परिसरामध्ये पुढील २४ तासांमध्ये धुक्याचं प्रमाण वाढणार असून, थंडीचा कडाकाही वाढणार आहे. तिथं नाशिक, निफाड क्षेत्रामध्येही तापमानात रातोरात घट झाल्यामुळं थंडीचा कडाका चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या काळात राज्यात गारठा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला असून, ही थंडी टप्प्य़ाटप्प्यानं संपूर्ण राज्य व्यापताना दिसेल.
सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे दक्षिणेत काही भागात पवसाचे वातावरण कायम आहे. तमिळनाडू, तिरुपतीत पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाची शक्यता नसली तरी वातावरणात मोठा बदल झाला आहे. राज्यात काही भागांतून पावसाने माघार घेतली असून काही ठिकाणी तापमानात वाढ तर काही ठिकाणी तापमानात घट झालेली दिसत आहे.
राज्यात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानात घट झालेली पाहायला मिळत आहे. किमान तापमानाचा आकडा १५ अंशांवर आला आहे. येत्या काळात या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरांमध्येही सकाळी आणि रात्री गारठा वाढला आहे. तर दुपारी उष्णता वाढल्याने उकड्यामुळे नागरिक हैराण होत आहे. मुंबई आणि उपनगरात अजूनही नागरिक चांगल्या थंडीच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्यातील सातारा, पुणे व कोल्हापुरातील घाटमाथ्यावरील परिसरात धुके वाढणार आहे. पुण्यात सकाळी मोठ्या प्रमाणात धुके पडत आहे. तर तापमाणात देखील घट झाली आहे. तर नाशिक, निफाड येथे देखील तापमानात घट झाल्यामुळं थंडी वाढल्याचं जाणवत आहे. येत्या काळात राज्यात गारठा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हळू हळू थंडी वाढणार आहे.
उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे. दिल्ली, बिहारमध्ये घुसमटल्यासारखी स्थिती सकाळच्या वेळी लोकांची होताना पाहायला मिळत आहे. दिल्लीत आधीच प्रदूषण आणि त्यात दाट धुक्याची चादर त्यामुळे हवेचा एयर क्वालिटी इंडेक्स खूप जास्त घसरला आहे.