Maharashtra Weather Update : उत्तर भारतातील हवामान यंदा जानेवारीच्या मध्यापासून बदलू लागले. दिवसा कडक ऊन आणि जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. फेब्रुवारीमहिन्यातच एप्रिल-मे सारखा उष्णता जाणवत असल्याने गहू व इतर रब्बी पिकांसाठी हे वातावरण धोकादायक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. राज्यात गेल्या पाच दिवसांपासून दिवसा उकाड्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसू लागला आहे. दिवस व रात्रीच्या तापमानात १७ अंश सेल्सिअसपर्यंत चा फरक दिसून येत आहे. होळीनंतर पडणारी उष्णता फेब्रुवारीमहिन्याच्या सुरुवातीलाच जाणवू लागली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील तापमानात गुरुवारच्या तुलनेत १ अंशाची घट झाली आहे. पुण्यातील कमाल तापमान ३६अंश सेल्सिअस तर किमान तापमान १२ अंश सेल्सिअस इतके होते. पुण्यामध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. साताऱ्यातील तापमानात देखील काहीशी घट बघायला मिळत आहे. साताऱ्यात देखील आकाश निरभ्र राहणार आहे. तर कमाल तापमान ३४ अंश तर किमान १७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उत्तर भारतात धुक्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होता. त्यानंतर वातावरण स्वच्छ होऊ लागले. आकाश स्वच्छ असल्याने सूर्याची थेट किरणे पृथ्वीवर येत आहे. एवढ्या कडक सूर्यप्रकाशामुळे हवेतील आर्द्रताही कमी झाली आहे त्यामुळे तापमानात मोठी वाढ होत आहे.
दक्षिण भारतातून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे हवामानात मोठे चढ उतार पहायल मिळत आहेत. दक्षिण भारतातून कोरडे वारे उत्तर भारताकडे वाहत आहेत. त्यामुळे दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात उकाडा जाणवत आहे. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. पश्चिमी विक्षोभाचा परिमाण हा राज्याच्या हवामानावर झाला आहे. हवामानातील हा बदल पिकांसाठी हानिकारक आहेत. अवकाळी पाऊस, गारपीट, अतिउष्णतेलाही ते जबाबदार आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
साधारणपणे जानेवारी महिन्यात पाऊस पडतो. मात्र, यंदा उत्तर भारतात जानेवारी महिना कोरडा होता. काही दिवस काही ठिकाणी केवळ रिमझिम पाऊस झाला. अशा तऱ्हेने पृथ्वीवरील आणि आकाशातील ओलावा नष्ट झाला. लोक थंडी येण्याची आणि थंडीचे दिवस संपण्याची वाट पाहत होते. गहू, हरभरा, मोहरी ही पिके चांगली तयार व्हावीत, यासाठी शेतकरी धुके आणि थंडीची आतुरतेने वाट पाहत असतात. कोरड्या वाऱ्यामुळे उशीरा येणाऱ्या पिकांचे दाणेही पातळ होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
संबंधित बातम्या