Maharashtra Weather Update : राज्यात हळूहळू गारठ्यात वाढ होत आहे. थंडीची चाहूल लागली असून थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्याही पेटू लागल्या आहेत. पुढील काही दिवसांत राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रात थंडीवाढू लागली आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. येथील तापमान महाबळेश्वर पेक्षाही कमी आहे. जळगावमध्ये मंगळवारी १६.१ कमाल किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर नाशिकमध्ये १६. ७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात थंडी वाढू लागली आहे. ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात पहाटे गारवा जाणवत आहे. तर रात्री सुद्धा गारठा वाढला आहे. दिवसभर मात्र, तापमानात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. मुंबई, नवी मुंबई व ठाण्यात मात्र, तापमान वाढलेले आहे. मुंबईत कोरडं व उष्ण हवामान असल्याने तापमानात वाढ जाणवत आहे. त्यामुळे गुलाबी थंडी कधी पडणार ? या प्रतीक्षेत मुंबईकर आहेत. त्यांना या साठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
हवमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. हळू हळू तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी ग्रामीण भागात गारवा वाढला आहे.
सध्या राज्यात जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. जळगावमध्ये १६.१ तर नाशिकमध्ये १६.७ तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागानुसार पुढील महिन्यात राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे.
पुण्यात देखील कडक्याच्या थंडीच्या प्रतीक्षेत नागरिक आहे. अजून म्हणावी तशी थंडी पुणेकर अनुभवत नसून पुढील महिन्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. सध्या पुण्यात हवामान कोरडे असून आकाश निरभ्र राहत आहे. तर सकाळी धुके पडत आहे. दुपारी तापमानात मोठी वाढ होत असल्याची परिस्थिती आहे. पुण्यात कमाल तापमान ३१. ७ तर किमान तापमान हे १७.१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे.