मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra weather update : विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आजही बरसणार; राज्यात पुढील काही दिवस असे असेल हवामान

Maharashtra weather update : विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आजही बरसणार; राज्यात पुढील काही दिवस असे असेल हवामान

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 28, 2024 06:08 AM IST

Maharashtra weather update : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने थैमान घातले आहे. आज देखील विदर्भातील काही जिल्ह्यात आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra weather update
Maharashtra weather update (AP)

Maharashtra weather update : राज्यात विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे, गारपीट आणि पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना बसला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस राज्यावर अवकळी पावसाचे ढग आहेत. आज आणि मार्च महिन्याच्या १ आणि २ तारखेला अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि नागपूर शहराला पावसाचा अलर्ट देण्यात आला असून मेघ गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Rajya Sabha Election : युपीत अखिलेश यादव यांना झटका; सपाच्या ८ आमदारांचे भाजपला मतदान

पुणे वेध शाळेने दिलेल्या अंदाजानुसार, एक पश्चिमी विक्षोभ पश्चिमेकडून हळूहळू पूर्वेकडे सरकत आहे. हा पश्चिमी विक्षोभ ५७ डिग्री पूर्व रेखांश व ३० डिग्री उत्तर अक्षांशावर आहे. एक द्रोणीका रेषा ईशान्य अरबी समुद्रापासून पूर्व राजस्थानपर्यंत आहे. अजून एक द्रोणीका रेषा दक्षिण कर्नाटकापासून मध्य महाराष्ट्रपर्यंत आहे. एक नवीन पश्चिमी विक्षोभ १ मार्च नंतर वायव्य भारताला प्रभावित करणार आहे. त्याच बरोबर बंगालच्या उपसागरावरून येणारे साऊथ ईस्टर्ली व साऊथ साऊथ ईस्टर्ली प्रती चक्रिय वारे आद्रता घेऊन येत आहेत. त्यामुळे कोकण गोवा वगळता राज्याच्या उर्वरित भागात वाऱ्यांची परस्पर क्रिया होण्याचा अंदाज आहे. तसेच १ मार्च नंतर जसा पश्चिमी विक्षोभ पुढे सरकेल त्यावेळेस पुन्हा कोकण गोवा वगळता राज्याच्या उर्वरित भागात वाऱ्यांची परस्पर क्रिया होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मेघ गर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. आज आणि १, २ मार्चला विदर्भाच्या अकोला, अमरावती, बुलढाणा व नागपूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह वीजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

Rashmi Shukla : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना दोन वर्षांची मुदतवाढ, विरोधकांकडून टीका

आज मध्य महाराष्ट्रात जळगावमध्ये आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. २९ फेब्रुवारी व १ मार्चला मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राज्यात किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यानंतर महाराष्ट्रात किमान किंचित घट होण्याची शक्यता आहे. तसेच यवतमाळ, वर्धा, भंडारा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये काही भागातहलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. दरम्यान, मराठवड्यातील बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यांमध्ये आज हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यात असे असेल हवामान

पुणे आणि परिसरात पुढील ४८ तासात आकाश मुख्यत: निरभ्र राहून वेळोवेळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. तर तीन व चार मार्चला आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. दोन तारखे नंतर पुढील दोन दिवस पुणे आणि परिसराच्या किमान तापमानात एक ते दोन डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान

मराठवाडा व विदर्भासह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडासह अवकाळीने तडाखा दिला. नाशिक जिल्ह्यात तर पावसाळ्यासारखा पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. या पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त झाली आहेत.

IPL_Entry_Point