मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Forecast : राज्यात पुढील २-३ दिवस पावसाची शक्यता, २९ जानेवारीनंतर थंडीचीही लाट

Weather Forecast : राज्यात पुढील २-३ दिवस पावसाची शक्यता, २९ जानेवारीनंतर थंडीचीही लाट

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 27, 2023 01:25 PM IST

MaharashtraweatherUpdate : महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला असून कधी पावसाळा तर कधी थंडीचा कडाका वाढत आहेत. अशातच आता पुढील दोन ते तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात पुढील २-३ दिवस पावसाची शक्यता
राज्यात पुढील २-३ दिवस पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update : गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला असून अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. गुरुवारी सांगली, बुलडाणा व सातारा जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या. राज्यात कधी थंडीचा जोर तर कधी पावसाळी वातावरण निर्माण होत आहे. सध्या राज्यात थंडीचा कडाका वाढला असून आता पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस बरसणार आहे. यामुळे फळपिकांसह रब्बी पिकांना याचा फटका बसणार आहे.

ईशान्येकडील वाऱ्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. गुरुवारही राज्यात काही ठिकाणी पाऊस झाला.

पावसाच्या सरी बरसण्याबरोबरच २९ जानेवारीनंतर राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळे २९ जानेवारीनंतर राज्यात थंडीची लाट येणार आहे. २ फेब्रुवारीपर्यंत राज्यात थंडीची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे मुंबईसह अनेक शहरातील कमाल तापमानात घट होऊ शकते. 

हवामान बदलामुळे राज्यात कधी थंडी तर कधी पाऊस पडत असल्याने त्याचा फटका  आहे. या  हवामानाचा रब्बी हंगामाच्या पिकांवर परिणाम होत आहे.

 

IPL_Entry_Point