Maharashtra weather update: सोमवारी विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ तर मराठवाड्यातील जालना आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, आज देखील यवतमाळ जिल्ह्यात तसेच तुरळक ठिकाणी गारपीट आणि पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून वादळीवारे, वीजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोसाट्याचे वारे देखील वाहणार असल्याने नागरिकांनी बाहेर पडतांना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज एक कमी दाबाची रेषा पूर्व मध्य अरबी समुद्रापासून दक्षिण मध्य प्रदेश पर्यंत आहे. प्रती चक्रवातीय वाऱ्यांबरोबर बंगालच्या उपसागरातून आग्नेय दिशेकडून काही वारे मध्य भारतात येत आहेत. ज्यामध्ये आद्रता आहे. एक पश्चिमेविक विक्षोभ म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स २९ फेब्रुवारी नंतर उत्तर भारताला प्रभावित करणार आहे. याचा परिणाम राज्याच्या होणार आहे.
पुढील काही दिवस कोकण गोव्यामध्ये हवामान कोरडे राहील. मध्य महाराष्ट्रात आज सुरळक ठिकाणी हकल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पुढील चार दिवस हवामान कोरडे राहील. मराठवाड्यात आज तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहील. तसेच एक मार्चला तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ मध्ये आज काही ठिकाणी व त्यानंतर चार दिवस तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भामध्ये आज तुरळ ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. आज २७ तारखेला मेघगर्जना व विजांच्या कडकडाटा सहित तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून वादळीवारे, वीजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात अनेक जिल्ह्यात तापमानात ढगाळ हवामानामुळे घट झाली आहे. मुंबई, पुणे,नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात थंडी वाढली आहे.
पुणे व आजूबाजूच्या परिसरात आज व उद्या आकाश अंशतः ढगाळ राहील. २९ तारखेच्या संध्याकाळ नंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासात किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच २९ तारखेच्या दुपारनंतर पुढील दोन-तीन दिवस किमान तापमानात किंचित वाढवण्याची शक्यता आहे.
जालना, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यात सोमवारी काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. रस्तावर गारांचा खच पडल्याचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले. सर्वाधिक फटका हा भोकरदन तालुक्याला बसला. येथे सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जोरदार गारपीट झाली. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे तर वीज पडून दोघे ठार झाले.