Maharashtra Weather Update : राज्यात पुढील काही दिवस पावसाचे आहेत. १५ मे पर्यंत वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, सातारा, चंद्रपूर, यवतमाळ, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना पुढील काही दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यांना १५ मे पर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा, ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात आज हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उद्यापासून पुढील तीन दिवस बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात पुण्यात ११ व १२ तर, सातारा येथे १२ तारखेला मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह गारपिट आणि पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुणे व सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा व विदर्भात १२ मे रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नांदेड, लातूर, चंद्रपूर, यवतमाळ, येथे मेघगर्चना विजांचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह पावसाची व गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. १४ मे पर्यंत उर्वरित बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
पुणे व परिसरात १० ते १५ मे पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. तर मेघगर्जना विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारी पुण्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. तर पुढील काही दिवस पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे तापमानात घट झाल्याने वाढीत्या तापमानापासूंन नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
राज्यात शुक्रवारी विदर्भासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. प्रामुख्याने नागपूर, संभाजीनगर, सांगली, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने नागरिकांची त्रेधा उधली. दरम्यान, वाढत्या तापमानापासून देखील सुटका झाली, कोल्हापूर, सातारा परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. आज याठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.