Maharashtra weather update : राज्यात एकीकडे उष्णतामन वाढत असताना आता पुन्हा अवकाळी पावसाचे संकट येणार आहे. सध्या एक पश्चिमी विक्षोभ म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाला असून या सोबतच उत्तर भारतात वाऱ्याच्या वरच्या थरामध्ये एक जेट्स स्ट्रीम जास्त तीव्र असल्याने याचा परिमाण राज्याच्या हवामानावर होणार आहे. राज्यात पुढील काही दिवस ढगाळ हवामानासोबत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, आज एक पश्चिमी विक्षोभ म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स मध्य पाकिस्तानवर आहे व एक वाऱ्याची प्रभारी चक्रीय स्थिती पंजाबवर आहे. तसेच उत्तर भारतात वाऱ्याच्या वरच्या थरामध्ये एक जेट्स स्ट्रीम जास्त तीव्र आहे. यामुळे २५ व २६ फेब्रुवारीच्या जवळपास बंगालच्या उपसागरातून आग्नेय वारे राज्यात आर्द्रता घेऊन येणार असून, त्यामुळे विदर्भामध्ये २६ व २७ फेब्रुवारीला तर मराठवाड्यात २७ फेब्रुवारीला ढगाळ वातावरणाबरोबर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार-पाच दिवस राज्याच्या संपूर्ण भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. आज दुपार नंतर २३ तारखेपर्यंत किमान तापमानाच बरोबर कमाल तापमानात मात्र किंचित घट होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील तापमाना वाढ होत आहे. पुणे, मुंबई, नागपूर, जळगाव, अकोला, वर्धा या सारख्या शहरात उन वाढले आहे. काही ठिकाणी पारा हा ३५ डिग्री सेल्सिअसवर पोहचला आहे. यामुळे जिवाची लाही वाढली आहे. दरम्यान, या हवामान बदलात कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील २६ तारखेनंतर काही भागात पाऊस पडण्याची वर्तवण्यात आली आहे.
पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील तीन-चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून पहाटे हलके धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील तीन-चार दिवस ढगाळ वातावरण कमी होऊन आकाश निरभ्र राहील. उत्तरी वाऱ्यामुळे राज्याच्या उत्तर मध्य भागात २० तारखेच्या दुपारपासून २३ तारखेपर्यंत हळूहळू किमान तापमानात तीन ते चार डिग्री सेल्सिअसणे घट होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर कमाल तापमानात मात्र घत होण्याची शक्यता आहे.