Maharashtra weather Update : राज्यात कुठे उष्णतेची लाट तर कुठे वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी राज्याच्या अनेक भगात वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली. दरम्यान, आज देखील वादळी वाऱ्यासह पवसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, सांगली व सोलापूर येथे पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांना सोमवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपले. राज्यात एकीकडे तापमान वाढत असतांना काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसला आहे. तर फळबाग व भाजीपाला पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अशात आज देखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज कोकण गोव्यात पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर म्हणजे १८ तारखेला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रत पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये पुढील दोन दिवस तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर १७ तारखेला हवामान कोरडे राहील. १८ तारखे नंतर तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. १९ तारखे नंतर मात्र तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे मुंबई व रायगड या जिल्ह्यांमध्ये १५ व १६ तारखेला तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच धाराशिव, अकोला, अमरावती व बुलढाणा वाशिम येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाट सहित वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच १६ व १७ तारखेला सांगली व सोलापूर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुण्यात सोमवारी पावसाच्या हलक्या सरी पडल्याने वाढत्या उष्णते पासून पुणेकर सुखावले. असे असले तरी पुण्यातील हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद सोमवारी झाली. पुण्यात पुढील चार-पाच दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई आणि उपनगराबाबत तापमान वाढणार आहे. मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी बाहेर पडतांना काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही तासात मुंबईकरांना सर्वात वाईट हवामानाचा सामना करावा लागणार आहे. उत्तर कोकणातील काही भागात तापमान ३८-३९ डिग्री सेल्सियस तर सांताक्रूझ, ठाणे ४२ डिग्री सेल्सिअस, नवी मुंबई ४१ डिग्री सेल्सिअस, कल्याण ४३ डिग्री सेल्सिअस, ४४ डिग्री सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या