Maharashtra Weather Update : राज्यात पुढील काही दिवस पावसाचे राहणार आहे. आज देखील मराठवाडा, विदर्भात काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, सातारा आणि पुणे जिल्ह्याला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आज राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा, सांभाजीनगर, जालना, परभणी, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार तीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हणजे डिप्रेशन हे वायव्य अरबी समुद्रावर आहे. त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. तर आणखी एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पूर्व विदर्भ व लगतच्या तेलंगानावर आहे. तर वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत सक्रिय आहे. आज मध्य आज महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्रात धुळे नंदुरबार येथे तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अत्यंत जोरदार म्हणजे २४ तासात २० सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस तर परभणी हिंगोली नांदेड येथे तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील जळगाव नाशिक मराठवाड्यातील औरंगाबाद जालना बीड व विदर्भातील अकोला व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात पाच व सहा सप्टेंबरला रायगड रत्नागिरी. सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात आज तर कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुणे सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील घाट विभागात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात आज औरंगाबाद, जालना, परभणी येथे तर विदर्भात आज पासून पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यातील व विदर्भातील वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे व परिसरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. तर तीन व चार सप्टेंबरला घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.