मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather : नव्या वर्षात थंडीचा कडाका! ढगाळ हवामानामुळे राज्याच्या तापमानात होणार मोठी घट; असे असेल हवामान

Maharashtra Weather : नव्या वर्षात थंडीचा कडाका! ढगाळ हवामानामुळे राज्याच्या तापमानात होणार मोठी घट; असे असेल हवामान

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 30, 2023 09:50 AM IST

Maharashtra Weather update: वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वर्षाच्या शेवटी नववर्षाच्या सुरुवातीला राज्यात ढगाळ हवामान राहणार असून थंडीत वाढ होणार आहे. देशात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

weather update
weather update

Maharashtra Weather Update Today : राज्यात गेल्या काही दिवसांपासूंन तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात तापमानात मोठी घट झाली असून थंडी वाढली आहे. दारमयह, पुढील दोन दिवसांत राज्यात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. ३० डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान राज्यात अनेक भागात ढगाळ हवामान राहून तापमानात सुमारे १ ते २ अंश सेल्सिअस डिग्रीने घट होणार आहे. राज्यात सध्या पुणे, मुंबईसह विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे. त्यात पुढील काही दिवस आणखी घट होण्याची शक्यता आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

Rashmi Shukla : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालकपदी वर्णी

सध्या राज्यावर कुठलीही खास वेदर सिस्टिम नाही. त्यामुळे हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात येणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे किमान तापमानात एक ते दोन डिग्री सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ढगांमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग कमी झाला असला तरी तापमानात आणखी घट होणार आहे. राज्यात ३० डिसेंबरपासून २ जानेवारी दरम्यान ढगाळ हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे देखील तापमानात घट होणार आहे.

Panvel news : सेल्फीचा मोह बेतला जिवावर ! प्रबळगड किल्यावरून कोसळून पुण्यातील नवविवाहितेचा मृत्यू

पुणे व परिसरात ३० डिसेंबर पर्यंत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. ३१ तारखेपासून ४ जानेवारीपर्यंत आकाश मुख्यत निरभ्र राहून दुपारी अथवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. तर एक जानेवारीपासून पुढे किमान तापमानात एक ते दोन डिग्री सेल्सियस वाढवण्याची शक्यता आहे.

राज्यात पुणे मुंबईसह नाशिक, संभाजीनगर, अहमदनगर, जळगाव, नागपूर येथे थंडी वाढण्याची शक्यता आहे. सध्या येथील तापमानात मोठी घट झाली असून नागरीक थंडी पासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा सहारा घेत आहे.

IPL_Entry_Point