Maharashtra Weather Update : पुण्यात थंडीचा कडाका वाढला!राज्यात तापमानात होणार घट, IMD ने काय दिला इशारा ?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : पुण्यात थंडीचा कडाका वाढला!राज्यात तापमानात होणार घट, IMD ने काय दिला इशारा ?

Maharashtra Weather Update : पुण्यात थंडीचा कडाका वाढला!राज्यात तापमानात होणार घट, IMD ने काय दिला इशारा ?

Jan 07, 2025 07:16 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे. किमान तापमानात घट होत आहे. पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यात थंडी वाढल्याने पुन्हा शेकोट्या पेटू लागल्या आहेत.

पुण्यात थंडीचा कडाका वाढला!राज्यात तापमानात होणार घट, IMD ने काय दिला इशारा ?
पुण्यात थंडीचा कडाका वाढला!राज्यात तापमानात होणार घट, IMD ने काय दिला इशारा ? (Nitin Sharma)

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढू लागला आहे. वाऱ्याची चक्राकार दिशा आणि अरबी समुद्रात आर्द्रता वाढत असल्याने तापमानात घट झाली आहे. किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने ही घट झाली आहे. त्यात राज्यावर चक्राकार वारे देखील सक्रिय झाले असून महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जिल्ह्यात किमान तापमानात १-२ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील काही दिवसांनत राज्यातील तापमान आणखी घट होणार असून ३-४ अंशांनी किमान तापमानात कमी होण्याची शक्यता हे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार सध्या विस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर पाकिस्तान सक्रीय आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसासह बर्षवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर राज्यावर चक्रीय चक्रवात मध्य महाराष्ट्रावर स्थित आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. उद्यापासून पुढील दोन-तीन दिवस किमान तापमानात तीन ते पाच अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. राज्यात कोकण विदर्भ व मराठवाड्यात तापमानात थोडी वाढ झाली आहे. मात्र, या तापमानात पुन्हा घट होणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात येत्या पाच दिवसात कोरड्या हवामान राहणार असून काही भागात ढगाळ हवामान राहणार आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यातही थंडी वाढत असून किमान तापमानात वाढ झाली असली तरी पुन्हा घट होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही जिल्ह्यात सोमवारी (दि. ६) किमान तापमानात वाढ झाली. तर रात्री आणि सकाळी थंडी वाढली होती. बहुतांश जिल्ह्यात किमान तापमान १० अंशांपेक्षाही अधिक नोंदवले गेले. त्यामुळे काही भागात थंडीचा कडाका कमी जाणवला.

पुण्यात कसे असेल हवामान ?

पुण्यात थंडीचा कडाका वाढला आहे. पुण्यात सकाळी आणि रात्री थंडी पडत असून दुपारी उष्णता वाढत आहे. पुण्यात किमान तापमानात घट होऊन सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर म्हणजेच ८ जानेवारी पासून पुढे चार-पाच दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच उद्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर मात्र तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर