Maharashtra Weather update : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका; दिवसा उष्णता तर रात्री गारठा, IMD ने दिला अलर्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather update : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका; दिवसा उष्णता तर रात्री गारठा, IMD ने दिला अलर्ट

Maharashtra Weather update : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका; दिवसा उष्णता तर रात्री गारठा, IMD ने दिला अलर्ट

Jan 04, 2025 07:26 AM IST

Maharashtra Weather update : राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यात हवामान कोरडे राहणार असून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका; दिवसा उष्णता तर रात्री गारठा, IMD ने दिला अलर्ट
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका; दिवसा उष्णता तर रात्री गारठा, IMD ने दिला अलर्ट (HT_PRINT)

Maharashtra Weather update : राज्यात थंडी पुन्हा वाढली आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात तापमानात घट झाली आहे. पुण्यासह, सातारा, सांगली कोल्हापूर जिल्ह्यात तापमानात कमालीची घट झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस राज्यात कोरडे हवामान राहणार असून किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या चारही उपविभागामध्ये पुढील चार ते पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील तीन दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही विदर्भात पुढील दोन दिवसात किमान तापमानात फारसा फरक होणार नाही. त्यानंतर किमान तापमान दोन ते नऊ सेल्सिअसणे वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणे व परिसरात पुढील दोन दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहून सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी व संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहून सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. पुण्यात कमाल तापमान २९ अंश डिग्री सेल्सीअस तर कमाल तापमान 13 अंश डिग्री सेल्सीअस नोंदवण्यात आलं. त्यामुळे पुण्यात दिवसा ऊन आणि रात्री थंडी असे वातावरण सध्या नागरिक अनुभवत आहेत.

सातारा जिल्ह्यात देखील थंडी वाढली आहे. येथील कमाल तापमान हे १३ अंश सेल्सीअस पर्यंत आहे. तर किमान तापमानात १ अंशांची घट झाली आहे. सांगली जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहणार असून किमान तापमान १५ अंश सेल्सीअस नोंदवण्यात आले. तर कोल्हापूरमध्ये देखील थंडी वाढली आहे. कमाल तापमान ३१ तर किमान तापमान १४ अंश सेल्सीअस राहण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर