Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात चढ आणि उतार होतांना दिसत आहे. राज्यात एकीकडे तापमानात वाढ होत असतांना पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष करून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात पुढील ३ दिवस वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यात काही भागात हवामान ढगाळ राहणार आहे. विदर्भातील वर्धा, यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात विदर्भ सोडून इतर भागात वातावरण कोरडे राहणार आहे. एक द्रोणिका रेषा मराठवाडा ते कोमोरीनपर्यंत तयार झाली आहे. तर दुसरी द्रोणिका रेषा उत्तर ओदिशा ते पूर्व विदर्भापर्यंत असल्याने विदर्भावर बाष्पयुक्त वारे येत असून त्यात आद्रर्तेचे प्रमाण जास्त आहे. यामुळे विदर्भात प्रामुख्याने पुढील तीन दिवस पूर्व विदर्भा मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अन्य भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळ राहू शकते.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात १५ ते १८, भंडारा गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात १६ ते १९, गडचिरोली जिल्ह्यात १६ ते १८, अमरावती यवतमाळ जिल्ह्यात १७ आणि १८ तर वर्धा जिल्ह्यात १७ ते २१ तारखेला वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर राज्यात इतरत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज हवामान मुख्यतः कोरडे राहण्याचा अंदाज आहे १८ संध्याकाळचे १९ तारीख वेळोवेळी आकाश ढगाळ राहण्याचा अनुमान आहे. तर किमान तापमानात फारसा बदल नाही. कमाल तापमानात किरकोळ वाढ अपेक्षित आहे.
आर्थिक राजधानी मुंबईत वाढत्या उन्हाने आणि दमट वातावरणामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. मुंबईत कमाल तापमानात वाढ झाली आहे. प्रामुख्याने तपमान्त ३५ डिग्री सेल्सिअस पेक्षाही वर गेल्याने नागरिक उकड्याने त्रस्त झाले आहे.