Maharashtra Weather Update : विदर्भ वगळता राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर बुधवारनंतर ढगाळ वातावरण कमी होऊन पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
अरबी समुद्रावर हवेची एक चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यापासून गुजरातपर्यंत एक द्रोणिका रेषा गेलेली आहे. तसेच पश्चिमी विक्षोभ हळूहळू पुढे येत आहे. साउथ ईस्टर्ली व साउथ साउथ ईस्टर्ली वारे दक्षिण पेनिन्सुलावरून जाऊन पुढे ते तीव्र होतील. त्यामुळे विंड इंटरॅक्शन हे महाराष्ट्राचे भारताच्या नॉर्थ वेस्ट सेंट्रल भागावर पुढील तीन ते चार दिवस राहण्याची शक्यता आहे.
राज्यात बहुतांश भागात फक्त विदर्भ वगळून पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना व ढगांच्या कडकडाटासहित अतिहत्या हलक्या ते हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक व औरंगाबाद येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. ९ जानेवारीला विदर्भात तुरळ ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
१० जानेवारीनंतर राज्याचे हवामान कोरडे राहील. राज्याच्या तापमानातील बदल जाणवणार आहे. ८ जानेवारी नंतर पुढील ३ ते ४ दिवस हलक्या पावसामुळे किमान तापमानात साधारण ३ डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे. परंतु विदर्भात व राज्याच्या उत्तरी भागात उत्तरी वाऱ्यामुळे किमान तापमानात जास्त घट होईल. तसेच ढगाळ वातावरण व हलक्या पावसामुळे कमाल तापमानात सुद्धा तीन ते चार डिग्रीने घट होईल. त्यामुळे ८ ते १० तारखे मध्ये दिवसा थंडी जाणवेल.
पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज असा असेल आज ढगाळ वातावरणात वाढ होईल. आज अति हलक्या पावसाची शक्यता आहे. ८ व ९ तारखेला विंड इंटरॅक्शनमुळे मेघगर्जनेसह ढगांचा कडकडाटा सहित हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील ७२ तासात सकाळी हलके धुके पडेल. या काळात किमान व कमाल तापमानात घट होण्यामुळे विशेषता ८ ते १० तारखेला दिवसा थंडी जाणवेल.