Maharashtra Weather Update : उत्तर भारतातील राज्यांमध्ये वाढती थंडी व सायक्लोनिक सर्क्युलेशमुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. अनेक जिल्ह्यात तापमान कमी झाले आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली आहे. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होणार आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
राज्यात गारठा वाढला आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंडी वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात घट झाली आहे. प्रामुख्याने विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम माराष्ट्रातील काही जिल्ह्यात तापमान कमी झालं आहे. पुणे, निफाड आणि धुळ्यात पारा हा १०.५ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिक थंडीने गारठले आहे. प्रामुख्याने रात्री आणि सकाळी थंडी जाणवत असून दुपारी तापमानात वाढ जाणवत आहे. राज्यात पुढील काही दिवसांनत गारठा वाढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उद्या पासून पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात वातावरणात बदल होऊन २६ पासून पुढे तापमानात बदल होण्याची शक्यता आहे. या मुळे दक्षिण भारतात काही राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात पुढचे काही डीवास हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पहाटे गारठा वाढण्याची शक्यता आहे. तर रात्री देखील तापमानात मोठी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील काही डीवास तापमानात बदल होणार नसला तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडी वाढेल असा अंदाज आहे.
पुण्यात तापमानात मोठी घट झाली आहे. किमान तापमान ११ अंश सेल्सिअसवार आलं आहे. सकाळी आणि रात्री मोठी थंडी पडत असून नागरिक शेकोट्यांचा आधार घेऊ लागले आहेत. सकाळी धुके पडत असून वातावरण गार राहत आहे. तर दुपारी ऊन असे चित्र पुण्यात अनुभवायला मिळत आहे.
मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबईत गारठा वाढला आहे. रात्री आणि पहाटेच्या सुमारास अल्हाददायक वातावरण आहे. मात्र, दुपारनंतर उकाडा वाढत असल्याचं चित्र आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागातही थंडी वाढली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यात तापमान १५ अंशापेक्षा कमी झाले आहे. हे तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापुरातील घाटमाध्यावरील क्षेत्रामध्येही थंडी वाढणार आहे. पुढचे पाच दिवस किमान आणि कमाल तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज आहे.