Maharasthra Weather update : राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे. आज मध्य महाराष्ट्रात पुणे अहमदनगर व नाशिक जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेगर्जना, वीजांचा कडकडाट सोसाट्याच्या वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. तर वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. कोकणातील ठाणे व मुंबईमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मेघ गर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनांक वरील जिल्ह्यांमध्ये हवमान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार मॉन्सूनचे आगमन दक्षिण अंदमान समुद्र व दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात तसेच निकोबार बेटावर अंदाजे १९ मे रोजी होण्याची शक्यता आहे. वातावरणातील खालच्या भागात वाऱ्याची एक चक्रीय स्थिती पश्चिम विदर्भ लगतच्या भागावर तयार झाली आहे. तसेच वाऱ्याची एक द्रोणीय रेषा, आग्नेय अरबी समुद्र व केरळच्या लगतच्या भागातून मराठवाड्यापर्यंत जात आहे. यामुळे पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
१५ मे रोजी मध्य महाराष्ट्रात पुणे अहमदनगर व नाशिक जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेगर्जना वीजांचा कडकडाट सोसाट्याच्या वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. तर कोकणातील ठाणे व मुंबईमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मेघ गर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनांक वरील जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग वगळता संपूर्ण कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी मेघ गर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पूर्व विदर्भ वगळता राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जना वीजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. तेथे वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. १६ मे रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भागात तसेच १७ मे रोजी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सर्व ठिकाणी विजांचा कडकडाट सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. तर १६ ते १८ मे दरम्यान, हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
पुणे व परिसरात पुढील तीन दिवस वीजांचा कडकडाट व मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे पुण्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. पुण्याचे कमाल तापमान हे ३७ डिग्री सेल्सिअस नोंदवल्या गेले. तर राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे ४२ डिग्री सेल्सिअस नोंदवल्या गेले.