Maharashtra IMD Weather Update : राज्यात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे. कमाल व किमान तापमानात वाढ होणार असून उकाडा वाढणार आहे. सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमान वाढले असून थंडी गायब झाली आहे. सकाळी आणि रात्री वगळता दिवसभर उष्णता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसभर पंखे आणि एसी सुरू ठेवण्याची वेळ आली आहे. पुढील काही दिवस उष्णता वाढण्याची शक्यता आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, वायव्य उत्तर प्रदेश ते राजस्थानपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने वातावरणात मोठा बदल झाला आहे. राज्यात काही ठिकाणबी गारठा तर कधी काही ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. हवामानात मोठ्या प्रमाणात चढउतार सुरू आहेत. कुठे ढगाळ हवामान, कुठे हलका पाऊस तर कुठे उष्णता यामुळे पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे रोगराई वाढली आहे.
राज्याच्या अनेक भागाचे तापमान वाढले आहे. कोकण, गोवा, मध्यमहाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात उकाडा वाढला आहे. सकाळी आणि रात्री थंडी तर दिवसभर उष्णतेने नागरिक हैराण झाले आहे. पुढील काही दिवस राज्यात कोरडे हवामान राहणार असून यामुळे कमाल व किमान तापमानात वाढ होणार आहे.
मुंबईसह उपनगरातून तर थंडी गायब झाली आहे. नागरिक घामांच्या धारांनी हैराण झाले आहेत. ठाणे व उपनगर, पनवेल-रायगर परिसरात सकाळी थंडी तर दिवसभर उकाडा जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात रात्री व सकाळी थंडी जास्त आहे. राज्यात पुढील दोन दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी धुके तर काही ठिकाणी ढगाळ हवामान राजणार आहे. ब्रह्मपुरी, रत्नागिरी, डहाणू आणि सांताक्रूझ इथे ३० ते ३२ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
पुण्यात पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहणार आहे. तर सकाळी आणि रात्री थंडी पडणार आहे. सकाळी विरळ धुके व ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.
दिल्लीत रविवारी दिवसभर कडक ऊन पडल्याने कमाल तापमानात झपाट्याने वाढ झाली. स्टँडर्ड ऑब्जर्वेटरी सफदरजंग येथे दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा ६.५ अंश सेल्सिअसने अधिक नोंदले गेले. २०१९ नंतर जानेवारी महिन्याच्या कोणत्याही दिवशी कमाल तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. दिल्लीतील बहुतांश भागात सकाळी हलके धुके होते. जसजसा दिवस वाढत गेला तसतसे धुकेही दूर झाले आणि कडक ऊन बाहेर पडले. दिवसभर कडक सूर्यप्रकाश बाहेर पडत असल्याने तापमानात झपाट्याने वाढ झाली. कमाल तापमान २६.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा ६.५ अंशांनी अधिक होते. किमान तापमान ९.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा १.६ अंशांनी अधिक होते.
संबंधित बातम्या