Maharashtra Weather Update : राज्यातून मॉन्सून पूर्णपणे परतला आहे. त्यामुळे गुलाबी थंडीची चालुल लागली आहे. काही जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाल्याची नोंद झाली आहे. तर काही ठिकाणी अद्याप उकाडा जाणवत आहे. प्रामुख्याने मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यात तापमानात वाढ झाली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात तापमानात घट झाली आहे.
राज्यात वातावरणात आता गारवा पसरू लागला आहे. त्यामुळे थंडीची चाहूल लागली आहे. यंदा राज्यात कडाक्याची थंडी पडल्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पारा हा २० च्या खाली यायला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये किमान तापमान हे १८ अंशांवर गेले आहे. तर जळगाव जिल्ह्यात किमान तापमान हे १६.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर नाशिकमध्ये देखील तापमान हे १७ अंशांवर आले होते. विदर्भात देखील काही परिसरात रात्री आणि पहाटे थंडी जाणवून लागली आहे. त्यामुळे अनेकांनी कपाटात ठेवलेले गरम कपडे बाहेर काढले आहे.
मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात उकाडा कायम आहे. या ठिकाणचे हवामान उष्ण व दमट आहे. त्यामुळे मुंबईकर घामाच्या धारांनी हैराण झाले आहे. मुंबईकर गुलाबी थंडीची वाट पाहात आहेत. विदर्भातही तापमान वाढले आहे. उन्हाची रखरख वाढली आहे. तर ऑक्टोबर हीटचा परिणाम देखील जाणवत आहे.
पुण्यात देखील उकाडा कायम आहे. सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणवते. हवामान विभागाने पुण्यातील हवामानात कोरडे राहून काही ठिकाणी धुके व आभाळ राहण्याची शक्यता वर्तवली आहे. पुण्यात फटक्यांमुळे हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. पुण्यात कमाल तापमान ३१ डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान हे १७.१ डिग्री सेल्सिअस एवढे आहे.
राज्यात थंडी वाढत असली तरी दिवसभर उष्ण वातावरण राहत आहे. दिवसाचे तापमान ३३ ते ३५ डिग्री राहत असून रात्री व सकाळी तापमानात घट होते.
राजधानी दिलील देखील थंडीचा कडाका वाढत आहे. दिल्लीत १० ते १२ नोव्हेंबरपूर्वी थंडीची लाट येण्याची शक्यता नसली तरी पुढील काही दिवसा मैदानी व डोंगरी भागात पाऊस पडण्याची शक्यता असल्याने पुढील काही दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता आहे.