Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या आठवड्यापासून संमिश्र वातावरण पाहायला मिळत होतं. थंडी गायब होऊन कुठे पाऊस तर कुठे उष्णता वाढ असे चित्र होते. मुंबई, पुण्यात तर तापमान वाढीमुळे नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे आता नागरिकांसाठी पुन्हा आनंदाची बातमी आहे. थंडीने पुनरागमन केलं आहे. रविवारी राज्याच्या तापमानात चार अंशाची घट झाली. पुढील काही दिवस थंडीत आणखी वाढ होण्यार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे उद्यापासून १३ डिसेंबर पर्यंत दक्षिणेकंदील राज्यात पुन्हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडी वाढणार आहे. याचा परिणाम हवामानावर देखील झाला आहे. महाराष्ट्रात दिवसा ६ डिग्री तापमान वाढ झाली होती. मात्र, या तापमानात आता घट झाली आहे. रातीचा पारा ४ डिग्री अंश सेल्सिअसने कमी झाला आहे. रात्रीचे तापमान १८-२० डिग्रीपर्यंत राहण्याची शक्यता आहे. हवमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काही जिल्ह्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. पुढील काही दिवसांत हा पारा १५ ते ११ अंशांपर्यंत खाली घसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा थंडी वाढणार आहे. फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असून मुंबईत देखील तापमान कमी होणार आहे. पुढील ३ दिवसात किमान तापमानात घट होऊन मुंबईकरांना दिलासा मिळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई आणि उपनगरात १७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर उपनगर व नवी मुंबईतही गारठा वाढायला सुरुवात झाली.
आग्नेय बंगालच्या उपसागरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र स्थिर आहे. त्याची वाटचाल वायव्य दिशेला होत असून त्याचे रूपांतर ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज व उद्या विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहणार आहे.
पुणे व परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहून सकाळी किंवा संध्याकाळी धुके पडण्याची शक्य आहे. पुण्यात काही दिवसांनपासून तापमानात मोठी वाढ झाली होती. मात्र, रविवारी पुण्याच्या तापमानात मोठी घट झाली. रविवारी पुण्यात १६ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
गोंदियामध्ये रविवारी अवकाळी पावसानं हजेरी लावली. संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली असून या पावसाचा फटका शेती पिकांना बसणार आहे.
संबंधित बातम्या