Maharashtra Weather Update: राज्यात काही जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यावर कमी दाबाची रेषा असून ती दक्षिण कर्नाटक ते विदर्भापर्यंत आहे. तसेच वरच्या हवेच्या थरातील वाऱ्याची चक्रिय स्थिती उत्तर मध्य महाराष्ट्रावर आहे आहे. त्यामुळे राज्यात आद्राता येत असल्याने पुढील ५ ते ७ दिवस पूर्व विदर्भा व्यतिरिक्त, राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत हलके धुके पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर मध्य कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तापमान कोरडे राहून किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
देशात उत्तर भरात थंडीची लाट कायम आहे. थंडीमुळे उत्तर भारत गारठला आहे. उत्तरे कडून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या थंड हवेचा राज्यातील हवामानावर देखील परिमाण होत आहे. राज्यातील तापमानविषयी बोलायचे झाल्यास, कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस कोरडे वातावरण राहणार आहे. किमान तापमानात घट होऊन गारठा वाढण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.
पूर्व विदर्भात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. दक्षिण कर्नाटक ते विदर्भापर्यंत हवेच्या कमी दाबाची रेषाअसून उत्तर मध्य महाराष्ट्रात हवेच्या वरच्या स्तरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने हवेत आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्याच्या बहुतांश भागात हलके धुके पडण्याची शक्यता आहे.
या प्रकारच्या हवामानामुळे उत्तर महाराष्ट्रात गारठा कमी झाला आहे.तर दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेलेले किमान तापमान पुन्हा ११ अंश सेल्सिअसवर आले आहे. राज्यात जळगावात सर्वांत कमी किमानाची नोंद झाली. जळगावमध्ये ११.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. येत्या चार ते पाच दिवस हवामान कोरडे राहून, हवेत गारठा वाढण्याची शक्यता आहे.
. पुणे आणि परसरातील तापमान पुढील पाच ते सात दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत हलके धुके पडण्याची शक्यता आहे. किमान तापमानात २० तारखेनंतर २ ते ३ डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.
मुंबईत देखील गारठा वाढला आहे, पुढील काही दिवस तापमानात घट झाली आहे. रात्री आणि सकाळी मुंबईत तापमान कमी राहत असून नागरीक गुलाबी थंडीचा आस्वाद घेत आहेत.