मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update:मुंबईसह राज्यात पुढील २ दिवस कोसळधारा! वादळी वाऱ्यासह बरसणार; हवामान विभागाने दिला 'हा' इशारा

Maharashtra Weather Update:मुंबईसह राज्यात पुढील २ दिवस कोसळधारा! वादळी वाऱ्यासह बरसणार; हवामान विभागाने दिला 'हा' इशारा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 11, 2024 06:44 AM IST

Maharashtra Weather Update: राज्यात मॉन्सूनने हजेरी लावली असून मॉन्सून हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र व्यापतोय. विदर्भात अद्याप पावसाची प्रतिक्षा आहे. तर पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात मॉन्सूनने हजेरी लावली असून मॉन्सून हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र व्यापतोय. विदर्भात अद्याप पावसाची प्रतिक्षा आहे. तर पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात मॉन्सूनने हजेरी लावली असून मॉन्सून हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र व्यापतोय. विदर्भात अद्याप पावसाची प्रतिक्षा आहे. तर पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Maharashtra Weather Update: राज्यात मॉन्सूनने हजेरी लावली असून मॉन्सून हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र व्यापतोय. विदर्भात अद्याप पावसाची प्रतिक्षा आहे. तर पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील दोन दिवस कोकण गोव्यात, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Sharad pawar : ‘हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही’, शरद पवार यांचा नरेंद्र मोदींवर घणाघात

राज्यातील उर्वरित जिल्ह्यात विजांचा कडकडाट सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मौसमी पाऊस उत्तर अरबी समुद्र व महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस पुढील दोन दिवसात उत्तर अरबी समुद्र व दक्षिण गुजरातच्या काही भागात तसेच महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे. वातावरणाच्या मधल्या थरात मराठवाड्याच्या लगतच्या भागात चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. १८ अंश उत्तर अक्षांशाजवळ वाऱ्याची द्रोणीका स्थिती वातावरणाच्या मधल्या थरात कायम आहे.

Modi 3 Cabinet Portfolio : महाराष्ट्रातील ६ मंत्र्यांना कोणती खाती मिळाली? रक्षा खडसे, मोहोळ यांच्यावर मोठी जबाबदारी

राज्यात या भागात जोरदार पावसाची शक्यता

आज व उद्या कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज दिनांक ११ जून रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येथे वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यात विजांचा कडकडाट सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. उत्तर महाराष्ट्र व उत्तर मराठवाडा वगळता राज्यातील उर्वरित जिल्ह्यात विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

Mumbai Rain : मुंबईकरांनी पहिल्या पावसाचं केलं स्वागत, सायकलिंग अन् सोशल मीडियावर घेतला आनंद

विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

दिनांक १२ जूनला पूर्व विदर्भ व १३ व १४ जूनला पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट दिलेला आहे.

मुंबई, पुण्यात पावसाचा जोर वाढणार

पुणे व परिसरात आज आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.    मुंबईत पुढचे २  दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, पुण्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसंच कोल्हापुरातही वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग