Maharashtra Weather update : राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी! आता ऑक्टोबर हीट देणार त्रास-maharashtra weather update rainfall in sporadic places in the state now the october heat will give trouble ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather update : राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी! आता ऑक्टोबर हीट देणार त्रास

Maharashtra Weather update : राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी! आता ऑक्टोबर हीट देणार त्रास

Oct 02, 2024 07:09 AM IST

Maharashtra Weather update : राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाला असून पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी! आता ऑक्टोबर हीट देणार त्रास
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी! आता ऑक्टोबर हीट देणार त्रास (HT_PRINT)

Maharashtra Weather update : राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. मंगळवारी काही तुरळक ठिकाणी राज्यात पाऊस झाला. मात्र, पुढील काही दिवस राज्यात तापमान कोरडे राहणार आहे. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. असे असले तरी पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होणार असून ऑक्टोबर हीट नागरिकांना जाणवणार आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोकण ते ईशान्य मध्य प्रदेश महाराष्ट्र लगत एक कमी दाबाचे दोन्ही क्षेत्र आहे. त्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या चारही उपविभागांमध्ये पुढील पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर येथे मेघगर्जना व विजांचा कडकडाट सहित तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट दिला आहे. राज्याच्या उर्वरित भागात पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मुख्यतः मराठवाडा विदर्भामध्ये काही ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

तापमानात होणार वाढ

सध्या ऑक्टोबर महिना सुरू झाला असून या महिन्यात नागरिकांना ऑक्टोबर हीटचा सामना करवा लागणार आहे. त्यामुळे जिवाची काहिली होणार आहे. राज्यातील काही भागात तापमान कोरडे असून तापमान देखील वाढले आहे. त्यामुळे घराबाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Whats_app_banner