Maharashtra weather update : राज्यात पावसाचा जोर वाढणार! कोकण, मुंबई, पुण्यासाठी IMD चा महत्वाचा इशारा!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra weather update : राज्यात पावसाचा जोर वाढणार! कोकण, मुंबई, पुण्यासाठी IMD चा महत्वाचा इशारा!

Maharashtra weather update : राज्यात पावसाचा जोर वाढणार! कोकण, मुंबई, पुण्यासाठी IMD चा महत्वाचा इशारा!

Jul 02, 2024 06:52 AM IST

Maharashtra weather update : राज्यात मॉन्सूनचा जोर वाढणार आहे. पुढील काही दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. तर मुंबई आणि पुण्याच्या घाट विभागात देखील मुळसाधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढणार! कोकण, मुंबई, पुण्यासाठी IMD चा महत्वाचा इशारा!
राज्यात पावसाचा जोर वाढणार! कोकण, मुंबई, पुण्यासाठी IMD चा महत्वाचा इशारा! (Hindustan Times)

Maharashtra weather update : राज्यात मॉन्सूनचा जोर वाढणार आहे. पुढील काही दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. तर मुंबई आणि पुण्याच्या घाट विभागात देखील मुळसाधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पाच जुलैपर्यंत ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, कोल्हापूर, सातारा येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना ५ जुलैपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर असलेल्या कमी दाबाचा पट्टा आज स्थिर आहे. कोकण गोव्यात पुढील पाच ते सात दिवस बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

कोकण गोव्यात मुसळधार

आज दोन तारखेला कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तीन व चार तारखेला कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पाच तारखेला कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात यलो अलर्ट

विदर्भामध्ये पुढील पाचही दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटा सहित ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, रायगड व रत्नागिरी येथे आज तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

नाशिक पुणे कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यांमधील घाट क्षेत्रांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यात पावसाचा जोर वाढणार

पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. व घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट विभागासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे .

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर